
नाशिक! विवाहितेच्या मृत्यू प्रकरणाला वळण, रिसॉर्टवर प्रियकराने घेतला जीव…
नाशिक : वाडीवऱ्हे परिसरातील सांजेगाव येथील मिरची हॉटेल-रिसॉर्टच्या प्रवेशद्वाराजवळ मिळालेल्या रूपाली पाटील (वय ३४) यांच्या मृत्यूचे गूढ अखेर उलगडले आहे. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या घटनेमागे प्रेमसंबंधातून झालेला खूनाचा प्रकार असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. मित्राचे नियंत्रण सुटल्याने कार प्रवेशद्वाराला धडकली आणि वाहनाच्या खाली येऊन रुपाली यांचा मृत्यू झाला, असा सुरुवातीला संशय होता.
रूपाली पाटील यांच्याशी वाद झाल्यानंतर संशयित दीपक सैंदाणे याने कारने पाठीमागून धडक देऊन त्यांचा जीव घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात अपघातासह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित दीपक शिवाजी सैंदाणे याला अटक करण्यात आली आहे.
View this post on Instagram
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपाली नीलेश पाटील (३४, रा. शिवनारायण अपार्टमेंट, एकदंतनगर, अंबड, नाशिक) या सिडको परिसरातील एका डायग्नोस्टिक सेंटरमध्ये कार्यरत होत्या. कंपनीच्या कामानिमित्त मित्र तथा प्रियकर दीपक सैंदाणे (४३, रा. अंबड) याच्यासोबत कारने वाडीवऱ्हे परिसरात गेल्या होत्या. दोघे सांजेगाव येथील एका रिसॉर्टमध्ये जेवणासाठी गेले. त्यापूर्वी कारमधून फिरत असताना दीपकने कारमध्येच मद्यपान केल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे.
रिसॉर्टमध्ये पोहोचल्यानंतर दोघांमध्ये वाद झाल्यानंतर रूपाली कारमधून उतरून रिसॉर्टच्या प्रवेशद्वाराकडे जात असताना दीपकने कार पाठीमागून वेगाने नेत त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या रूपाली यांचा मृत्यू झाला. रुपाली पाटील यांच्या मागे पती, मुलगी आणि सासू-सासरे असा परिवार आहे. या घटनेची माहिती सिडको परिसरात पसरताच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, घटनेनंतर हा प्रकार प्रथमदर्शनी अपघात असल्याचे भासत होते. मात्र, परिस्थिती संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी दीपक याला तत्काळ ताब्यात घेतले. कसून चौकशीत रूपाली आणि आपले मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची कबुली त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस पुढील तपास करत आहेत.
नाशिकमध्ये महिलेचा सुटकेसमध्ये मृतदेह; अनैतिक प्रेमसंबंधातून संपवलं…
नाशिक! महिला डॉक्टरच ठरली मनीषा जेजुरकरांच्या मृत्यूला कारण; प्रेमसंबंध…
नाशिक जिल्ह्यातील युवतीच्या खुनाचा गुन्हा काही तासांतच उघड; प्रेमसंबंधातून हत्या…
नाशिकमध्ये प्रेम प्रकरणातून विवाहितेचे टोकाचे पाऊल; सुसाईड नोटमध्ये म्हटले की…
नाशिक! वैष्णवी आवारे हत्येचा उलगडा; प्रियकराला दुसऱ्यासोबत लग्न जमल्याचा राग…

