
You Tube वर मोराच्या रश्श्याची रेसिपी दाखवणारा अटकेत…
हैद्राबाद (तेलंगणा): एका युट्यूबरने मोराचा रस्सा अर्थात Pecock Curry बनवण्याचा एक व्हिडीओ You Tubeच्या माध्यमातून शेअर झाला होता. सिरसिला जिल्ह्यातील प्रणय कुमार याच्याविरोधात कारवाई करण्यात आली असून, संबंधित व्हिडीओसुद्धा हटवण्यात आला आहे.
कोडम प्रणय कुमार असे या युट्यूबरचे नाव असून, त्याने Traditional Pecock Curry चा व्हिडीओ युट्यूबवर शेअर केला होता. दरम्यान, हा सर्व प्रकार पाहून वन्यजीव संरक्षक संघटनांनी या युट्यूबवर संपात व्यक्त केला होता. शिवाय, व्हिडीओ हटवल्यानंतरही त्याच्यावर आणखी कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. आरोपीने यापूर्वी सुद्धा जंगली डुकराची शिकार करत त्यापासून तयार करण्यात आलेल्या एका पदार्थाचा व्हिडीओ शेअर केला होता. सिरसिलाचे एसपी अखिल महाजन यांच्या माहितीनुसार प्रणय कुमारविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अशी कृत्य करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचा थेट इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रणय कुमार फरार झाला होता. ज्यानंतर पोलिसांनी तातडीने त्याचा शोध घेतला आणि अटक केली. वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत मोराची गणना अनुसूची 1 अंतर्गत केली जात आहे. मोराला मारणे हा एक दंडनीय अपराध आहे. सदर गुन्ह्याप्रकरणी किमान 3 वर्षांचा कारावास आणि कमाल 7 वर्षे कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
Video क्रुरपणाचा कळस! बैलावर हल्ला करून कुऱ्हाड पाठीतच खुपसली…
विकृती! गर्भवती बकरीवर तीन दारुड्या युवकांकडून बलात्कार…
विकृती! गायीवर बलात्कार करताना कॅमेऱ्यात कैद; Video Viral…
विकृती! मादी श्वानाशी अनैसर्गिक सेक्स करताना एकाने पाहिले अन्…
संतापजनक Video: आईस्क्रीमवाला हस्तमैथुन करून ग्लासमध्ये टाकत होता वीर्य…

