पुणे! नवले पुलाजवळ ट्रकने तीन वाहनांना दिली जोरदार धडक…
पुणे : पुणे शहरातील नवले पुलाजवळ मंगळवारी (ता. २८) पहाटे ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने एकामागोमाग तीन वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात दोन वाहनचालक किरकोळ जखमी झाले असून, तीनही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे. कात्रज चौकाकडून फरश्या घेऊन नवले पुलाच्या दिशेने येणारा ट्रक […]
अधिक वाचा...पुणे शहरात लक्ष्मीपूजनाला किती ठिकाणी लागली आग पाहा…
पुणे: पुणे शहरात दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अनेक ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहे. परंतु, अग्निशमन दलाने तत्काळ आग आटोक्यात आणल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. १) ०५.१२ – हडपसर, गल्ली क्रमांक १५ येथे मोकळ्या जागेत आग (हडपसर अग्निशमन वाहन) २) ०७.२० – वारजे, चौधरी दत्त मंदिर जवळ दुकानात आग […]
अधिक वाचा...दिवाळीच्या दिवशीच लॉजवर आढळला व्यापाऱ्याचा मृतदेह…
जालना: जालना शहरातील बस स्थानक परिसरातील शिवनेरी लॉजवर एका व्यापाऱ्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. सोमवारी (ता. २०) रात्री ९ वाजेच्या सुमारास शिवनेरी लॉजवर एका वृद्धाचा मृतदेह आढळल्याची माहिती सदर बाजार पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी […]
अधिक वाचा...रायगडमध्ये FB मित्राने घात केला ठेवले शरीरसंबंध अन्…
रायगड : महाड तालुक्यातील एका महिलेला फेसबुकवरील मैत्री महागात पडली आहे. FB मित्राने मागील अडीच वर्षांपासून विवाहित महिलेला ब्लॅकमेल करून तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेने पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी महाड शहर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला विवाहित असून, तिची ३८ वर्षीय आरोपीसोबत […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांनी काही फटाक्यांवर घातली बंदी; आदेश मोडल्यास…
पुणे : ध्वनी आणि वायू प्रदूषणामुळे अनेक नागरिक त्रस्त होतात. पर्यावरणाचे रक्षण आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पुणे पोलिसांनी काही फटाक्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि पर्यावरण संरक्षण कायद्याच्या अधीन घेण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी फटाक्यांवर काही मर्यादा लागू करण्यात आल्या आहेत. ध्वनी प्रदूषण करणारे, जास्त आवाजाचे […]
अधिक वाचा...नाशिक! गर्लफ्रेंडमुळे तीन वर्ष जगायला मिळाली; लव्ह यू अन् गूड बाय…
नाशिक: एका इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याने कॉलेजच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आपण तीन वर्षांपूर्वी आत्महत्या करणार होतो. पण गर्लफ्रेंडमुळे आणखी तीन वर्षे जगायला मिळाली, अशा आशयची इन्स्टाग्राम पोस्ट लिहून युवकाने जीवन संपवले आहे. युवक शिक्षणात ९५ टक्के मार्क्स मिळाले होते. हुशार विद्यार्थ्याने अशाप्रकारे टोकाचं पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त […]
अधिक वाचा...युवकासोबत ठरला 500 रुपयांत शरीरसंबंधचा सौदा अन् केलं कांड…
मुंबई: मुंबईच्या गिरगाव परिसरात एका युवकासोबत फसवणुकीची धक्कादायक प्रकार घडला आहे. शारीरिक संबंधाच्या आमिषाला बळी पडून अनोळखी महिलेवर विश्वास ठेवला आणि अडकला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. एका युवतीने ५०० रुपयांत शारीरिक संबंधाचे आमिष दाखवून एका युवकाला लुबाडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी व्ही. पी. रोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला […]
अधिक वाचा...गॅंगस्टर निलेश घायवळ याचा आणखी एक कारनामा समोर…
पुणे: पुणे शहरातील कोथरूड परिसरातील गोळीबार आणि कोयत्याने हल्ला झाल्यानंतर घायवळ गॅंगची प्रमुख गॅंगस्टार निलेश घायवळ हा पत्नी आणि मुलासह युरोपला पळाला आहे. पोलिसांनी सुरू केलेल्या चौकशीदरम्यान नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. निलेश घायवळ आणि त्यांच्या पत्नीच्या नावे दोन वेगळ्या मतदारसंघात चार मतदान ओळखपत्रे असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी समोर आणली आहे. […]
अधिक वाचा...पांढरकवडा येथील १२ यात्रेकरुंची ५ लाख ७२ हजार रुपयाची फसवणूक…
घाटंजी (यवतमाळ): मुंबई येथील एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या व्यवस्थापकाने पांढरकवडा येथील १२ जणांची ५ लाख ७२ हजार रुपयाने फसवणूक केल्याची लेखी तक्रार पांढरकवडा येथील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे संचालक नरेंद्र सदाशिव नार्लावार यांच्यासह १२ जणांनी पांढरकवडा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. सदर प्रकरणाची चौकशी पांढरकवडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे व त्यांचे […]
अधिक वाचा...पुणे! एका १४ मजली इमारतीला लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू…
पुणे (संदिप कद्रे): एका १४ मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत एका १५ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर आग आटोक्यात आणणाऱ्या दोन जवानांसह पाच जण जखमी झाले. या आगीमध्ये संपूर्ण सदनिका जळाली असून, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. पुण्यातील उंड्री येथील जगदंबा भवन रोडवरील मार्वल आयडियल स्पेसिओ सोसायटीच्या १२व्या मजल्यावर शुक्रवारी दुपारी आग लागली. […]
अधिक वाचा...
