जालना जिल्ह्यात चारचाकी विहिरीत कोसळली; सात जणांचा मृत्यू…
जालना : जालना जिल्ह्यातील राजूर रोड वरील तुपेवाडी फाट्याजवळ काळी पिवळी जीप विहिरीत कोसळली असून, सात जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. गाडीत 12 प्रवासी असण्याची शक्यता आहे. तीन जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! जालन्यातून काही प्रवासी काळ्या-पिवळ्या जीपमधून राजूरच्या दिशेने जात होते. राजूरकडे जात असताना […]
अधिक वाचा...IAS पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पोलिसांनी केली अटक
पुणे: राज्यभरात चर्चेत असलेल्या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील महाड मधील हॉटेलमधून अटक केली आहे. मनोरमा खेडकरचे काही दिवसांपुर्वी स्थानिक शेतकऱ्यांना धमकावतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. पुणे पोलिसांशी देखील त्यांनी हुज्जत घातली होती. गेल्या काही दिवसांपासून मनोरमा खेडकरचा तपास पोलिस करत होते. […]
अधिक वाचा...मुंबईतील रिलस्टार युवतीचा धबधब्याजवळ तोल जाऊन मृत्यू…
रायगड : रायगड जिल्ह्याच्या माणगाव कुंभे येथील जलविद्युत प्रकल्प परिसरात फिरायला गेलेल्या युवतीचा धबधब्याजवळ तोल जाऊन मृत्यू झाला आहे. अन्वी संजय कामदार (वय 27, रा. माटुंगा) असे मृत युवतीचे नाव असून, ती रिलस्टार होती. मुंबईच्या माटुंगावरुन युवती आपल्या 6 मित्रांसोबत पावसाळी सहलीसाठी या भागात फिरण्यासाठी आली होती. अन्वी हिला सेल्फीच्या नादात धबधब्याजवळ अपघात झाला, त्यातच […]
अधिक वाचा...ड्रिंक ऍण्ड ड्राईव्ह! पुणे शहरात राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाने दोघांना उडवले…
पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर भागात पॉर्शे आणि वरळीतल्या हिट ऍण्ड रन प्रकरणानंतर पुण्यात आणखी एक असाच प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्याचे माजी नगरसेवक बंडू गायकवाड यांचा मुलगा सौरभ गायकवाड याने दारू पिऊन अपघात केला आहे. ड्रिंक ऍण्ड ड्राईव्हच्या या घटनेत कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचे ड्रायव्हर आणि क्लिनर जखमी झाले आहेत, त्याचबरोबर सौरभ […]
अधिक वाचा...IAS पूजा खेडकर यांना अकॅडमीमध्ये पुन्हा हजर राहण्याचे आदेश…
मुंबई : प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांचा महाराष्ट्रातील प्रशिक्षण कालावधी संपवण्यात आला असून मसुरीतील प्रशिक्षण संस्थेत परत बोलावण्यात आले आहे. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले आहेत. लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमी यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने ही कारवाई केली. 23 जुलै पूर्वी मसूरी येथील अकॅडमीमध्ये […]
अधिक वाचा...मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघातात पाच भाविकांचा मृत्यू तर अनेक जखमी…
मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे भाविकांच्या बसला मध्य रात्री एकच्या सुमारास भीषण अपघात झाला असून, या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात 49 जण जखमी झाले असून, जखमी भाविकांपैकी सात ते आठ जणांची प्रकृती गंभीर आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. जखमींना स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले […]
अधिक वाचा...IAS पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा पाय आणखी खोलात…
पुणे : प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा पाय दिवसेंदिवस खोलात जाताना दिसत आहे. पूजा खेडकर यांनी खाजगी गाडीवर लावलेला लाल दिवा आणि त्यानंतर आई मनोरमा खेडकर यांनी पिस्तुल हातात घेत, शेतकऱ्यांवर केलेली दादागिरी यांसह समोर आलेल्या अनेक प्रकरणांमुळे आता पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबीयाच्या अडचणींत आणखी वाढ होणार आहे. या प्रकरणाचा अहवाल राज्याच्या पोलिस […]
अधिक वाचा...IAS पुजा खेडकर कुटुंबीयांचे राजकीय संबंध कोणासोबत पाहा…
पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबांला कोणाचा राजकीय वरदहस्त आहे, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यानंतर खेडकर कुटुंबीयांचे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासोबत संबंध असल्याचे समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान या ट्रस्टला मनोरमा खेडकर यांनी 12 लाख रुपयांची देणगी […]
अधिक वाचा...IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल…
पुणे : वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर यांची पुण्याहून वाशिमला बदली करण्यात आली असून, त्या चर्चेत आहेत. दुसरीकडे पूजा खेडकर यांचे आई-वडील दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांच्याविरोधात एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता पूजा खेडकर यांच्या कुटुंबाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मनोरमा खेडकर यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये […]
अधिक वाचा...IAS पूजा खेडकर प्रकरण! ऑडी कारवरील दंड अन् मालकाचे नाव समोर…
पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर सध्या चर्चेत आहेत. पण सर्वात अधिक चर्चा झाली ती पूजा खेडकर यांच्या ऑडी कारची. या कारवर त्यांनी लालदिवा लावला होता. तिथूनच हा वाद सुरू झाला. पूजा खेडकर वापरत असलेली ऑडी कार ही त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या माजी सहकाऱ्याची असून, तिच्यावर २७ हजार रुपयांचा दंड आहे. पूजा खेडकर […]
अधिक वाचा...
