ससूनचा डॉ. अजय तावरे अन् अमर मकानदारमध्ये ७० कॉल…
पुणे : ससून रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागाचा अधीक्षक डॉ. अजय तावरे आणि अश्फाक मकानदार या दोघांमध्ये गेल्या ५ महिन्यात ७० कॉल झाल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. अल्पवयीन मुलाच्या रक्त नमुन्यात बदल केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने अश्फाक मकानदार आणि अमर गायकवाड या दोघांना अटक केली आहे. यापूर्वीही तावरे आणि मकानदार या दोघांनी मिळून काही बेकायदेशीर […]
अधिक वाचा...रशियात डॉक्टर होण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू…
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थी रशियामध्ये एमबीबीएस होण्यासाठे गेले असून, वोल्खोव्ह नदीच्या किनारी फेरफटका मारत होते. त्यावेळी लाट येऊन त्यांचा त्यात बुडून मृत्यू झाला आहे. ते यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये वैद्यकीय शाखेत शिकत होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रशिया येथील दुतावासातील कुमार गौरव (आय.एफ.एस ) यांच्याशी संपर्क करून सर्व माहिती घेतली. प्राथमिक माहितीनुसार, हर्षल […]
अधिक वाचा...मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पोलिसांनी नाकारली परवानगी…
जालना: मनोज जरांगे पाटील हे शनिवारपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसणार होते. मात्र, पोलिसांनी आता त्यांना परवानगी नाकारली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्र असलेल्या आंतरवाली सराटीच्या गावकऱ्यांनी मनोज जरांगे पाटील यांना आमरण उपोषणाला विरोध केला होता. त्यानंतर आता पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना आमरण उपोषण करण्यापासून रोखण्याचा निर्णय घेतला आहे. चार दिवसांपूर्वी […]
अधिक वाचा...पुणे कार प्रकरणाला नवे वळण; आणखी दोन जणांना अटक…
पुणे (संदिप कद्रे) : पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरात वेगाने चालवत असलेल्या धनिकपुत्र अल्पवयीन मुलाने महागड्या पोर्शे कारने दुचाकीला धडक दिली होती. या घटेत अभियंता युवक आणि युवतीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात दररोज नव नवीन खुलासे होत असून, पोलिसांनी आणखी दोन जणांना अटक केली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी अल्पवयीन मुलाचे रक्त न घेता आईचे रक्त […]
अधिक वाचा...मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीची 10 मजल्यावरून उडी मारून आत्महत्या…
मुंबई : मुंबईतील आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीने 10 मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विकास रस्तोगी आणि राधिका रस्तोगी या आयएएस दाम्पत्याच्या मुलीने मंत्रालयासमोर असलेल्या सुरुची या इमारतीवरुन पहाटे चार वाजता उडी मारुन आत्महत्या केली. या मुलीचे नाव लिपी रस्तोगी (वय २६) असे आहे. या घटनेमुळे मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. […]
अधिक वाचा...पुणे पोर्शे कार अपघातातील धनिकपुत्र अल्पवयीन मुलाची कबुली…
पुणेः पुणे शहरातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघाताच्या रात्री मद्यधुंद होतो, अशी कबुली धनिकपुत्र अल्पवयीन मुलाने पोलिसांच्या तापासात दिली आहे. 19 मे 2024 रोजी कल्याणीनगर येथे भरधाव पोर्शे कारने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला होता. या वेळी आपण मद्यधुंत अवस्थेत असल्याचे अल्पवयीन आरोपीने कबूल केले आहे. तसेच अपघाताबद्दल आपल्याला फारसे आठवत नसल्याचेही संबंधित मुलाने पोलिस चौकशीदरम्यान […]
अधिक वाचा...पुणे कार अपघातातील अल्पवयीन मुलाची आई शिवानी अगरवालने केला खुलासा…
पुणेः पुणे शहरातील कल्याणीनगर येथे महागड्या पोर्शे कारने दोघांना रस्त्यावर मारल्यानंतर दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अल्पवयीन आरोपीचे ससून रुग्णालयात घेण्यात आलेले रक्ताचे सॅम्पल कचऱ्याच्या डब्यात टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर घेण्यात आलेले सॅम्पल कोणाचे अशी चर्चा रंगली होती. आता हे रक्त त्या अल्पवयीन पोराच्या आईनेच दिल्याचे चौकशीत उघड झाले आहे. शिवानी अगरवालला […]
अधिक वाचा...पुणे अपघातातील अगरवाल पिता-पुत्रास न्यायालयीन कोठडी; पण, पोलिस पुन्हा ताबा घेणार…
पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अगरवाल आणि सुरेंद्रकुमार अगरवाल यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यापूर्वीच विशाल अगरवालची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. तत्पूर्वी पुणे पोलिसांनी विशाल अगरवालची पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने ती फेटाळत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली […]
अधिक वाचा...पुणे अपघात प्रकरणाला नवं वळण; वडील, आजोबानंतर आता आईलासुद्धा होणार अटक?
पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर महागडी पोर्शे कार चालवत असलेल्या धनिक पुत्राने दोघांचे बळी घेतल्यानंतर दरररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी ससूनमधील दोन डॉक्टरांसह वॉर्डबॉयला निलंबित केले आहे. तर डीनला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. आता अल्पवयीन मुलाच्या वडील आणि आजोबानंतर त्याच्या आईलासुद्धा अटक केली जाण्याची शक्यता आहे. वडील […]
अधिक वाचा...भीषण अपघात! सांगलीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू; पाहा नावे….
सांगली: तासगाव-मणेराजुरी मार्गावर मंगळवारी (ता. २८) मध्यरात्री कारला झालेल्या भीषण अपघातामध्ये एकाच कुटुंबामधील सहा जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मृतांमध्ये तीन लहान बालकांचा समावेश आहे. चिमुकलीचा वाढदिवस साजरा करून हे कुटुंब परतत होतं, तेव्हाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. अपघातामधून सुदैवाने एक मुलगी बचावली पण तिला सहा मृतदेहांसोबत अख्खी रात्र काढावी लागली. पोलिसांनी दिलेल्या […]
अधिक वाचा...
