महाराष्ट्रात बॅंकेत ३०० कोटींचा घोटाळा अन् मथुरेत राहात होता साधुच्या वेषात…

लखनौ (उत्तर प्रदेश): महाराष्ट्र पोलिसांच्या एका पथकाने वृंदावन पोलिसांच्या मदतीने मथुरा जिल्ह्यातील कृष्ण बलराम मंदिराजवळ एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्यावर महाराष्ट्रात सुमारे 300 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. बबन विश्वनाथ शिंदे (वय 63) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील तो रहिवासी आहे. पोलिस अधीक्षक (शहर) डॉ. अरविंद कुमार यांनी […]

अधिक वाचा...

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या महिलेची पटली ओळख…

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयावर आज (दि.27) एका महिलेने हल्ला केला होता. त्यानंतर मंत्रालय परिसरात खळबळ उडाली होती. ही महिला देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचल्याने सर्वांकडून आश्चर्य व्यक्त केले जात होते. संबंधित महिलेची ओळख पटली असून, धनश्री सहस्रबुद्धे असे नाव आहे. संबंधित महिला दादरमधील रामगिरी या इमारतीमध्ये राहते. ही महिला सोसायटीमध्येही […]

अधिक वाचा...

पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात गर्भवती महिलेचा मृत्यू…

पुणेः कार व पिकअप जीपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कारमध्ये बसलेल्या एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. चालकासह दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवार (ता. 24) बिरदवडी फाटा ते पुणे नाशिक महामार्ग दरम्यान घडला आहे. हर्षदा केतन खानेकर (वय 27 सध्या रा. भायखळा मुंबई, मूळ रा. नारायणगाव, जुन्नर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या […]

अधिक वाचा...

अक्षय शिंदे याच्या मृतदेहाचे दहन नाही तर दफन केले जाणार; कारण…

ठाणे : बदलापूरच्या शाळेत चार आणि सहा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला आहे. अक्षय शिंदेचा मृतदेह दहन न करता दफन करण्याची इच्छा त्याच्या कुटुंबाने व्यक्त केली आहे. अक्षय शिंदे याच्या वडिलांचे वकील अमित कटारनवरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. पुरावे नष्ट होऊ नये म्हणून मृतदेह पुरला […]

अधिक वाचा...

बदलापूर प्रकरण! वकिलाचा दावा अन् संशयास्पद पोलिस चकमकीवर प्रश्न…

बदलापूर : बदलापूर पॉस्को प्रकरणातील एका अल्पवयीन पीडितेच्या पालकांवर प्रचंड दबाव आहे, कारण काही स्वार्थी लोक या प्रकरणाची विशेष तपास पथक (एसआयटी) सखोल चौकशी करण्याची मागणी करत तक्रार मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणत आहेत. गोळीबाराची घटना सोमवारी, पॉस्को प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या हत्येने पालकांना आणखी हादरवून सोडले आहे, असा दावा ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! गर्भवती असल्याची गुडन्यूज मिळाली अन् नको ते घडलं…

अमरावती : डॉक्टर डॉ. पल्लवी कदम यांचा मेळघाट येथे झालेल्या बस अपघातात मृत्यू झाला आहे. जुलै महिन्यात त्यांचा विवाह झाला होता आणि त्या गर्भवती राहिल्या होत्या. त्यांच्या मृत्युमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. डॉ. पल्लवी कदम यांचा 11 जुलै रोजी राहुल इंगोले यांच्याशी विवाह झाला होता. 8 दिवसांपूर्वीच त्यांना त्या गर्भवती असल्याची गुडन्यूज मिळाली होती. […]

अधिक वाचा...

अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांचा ‘त्या’ कागदाबाबत गंभीर आरोप…

ठाणे : बदलापूरमध्ये शाळेत दोन लहान चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी (ता. २३) एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. मात्र, अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. बदलापूर प्रकरणातील इतर सहा आरोपींना वाचवण्यासाठी माझ्या मुलाचा बळी देण्यात आला, असा आरोप अक्षय शिंदे याच्या वडिलांनी केला. अक्षय शिंदे याचे आई-वडील सोमवारी रात्रभर अक्षयचा […]

अधिक वाचा...

अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरची A टू Z स्टोरी…

ठाणे : बदलापूरातील शाळेत लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याची आत्महत्या नाही तर एन्काऊंटर झाल्याची माहिती पुढे आली आहे. पोलीसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला असून, या गोळीबारात अक्षय गंभीर जखमी झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. एका पोलिस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, अक्षय शिंदे याने स्वत:वर गोळी झाडली नसून अक्षयचा एन्काऊंटर झाला आहे. अक्षय शिंदे याला […]

अधिक वाचा...

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने स्वत:वर झाडली गोळी!

ठाणे: बदलापूरमधील शाळेतील चार आणि सहा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा आज (सोमवार) प्रयत्न केला आहे. ट्रान्झिट रिमांडमध्ये असलेल्या अक्षय शिंदे याने पोलिसांची बंदुक हिसकावून घेतली आणि स्वत: वर गोळी झाडली. या गोळीबारात अक्षय हा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात […]

अधिक वाचा...

शाळेत विद्यार्थ्यांना शिकवत असतानाच ‘आदर्श शिक्षका’ने घेतला अखेरचा श्वास…

नागपूर : विद्यार्थ्यांना शिकवत असतानाच शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना काटोल येथे घडली आहे. विजय धवड (वय ५७) असे मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी सरकारकडून त्यांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कारही मिळाला होता. शिक्षक विजय धवड यांच्या निधनाने विद्यार्थ्यांसह अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत. काटोल तालुक्यातल्या कोंढळी परिसरातल्या वाई शाळेत विजय धवड हे मुख्याध्यापक होते. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!