ग्रेटर नोएडामध्ये जीएनआयओटी महाविद्यालयाजवळ वेगवान गाडीखाली चिरडले गेले पाच विद्यार्थी…

ग्रेटर नोएडा: नॉलेज पार्क कोतवाली परिसरातील जीएनआयओटी महाविद्यालयाजवळ, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाच विद्यार्थ्यांना भरधाव गाडीने धडक दिली. घटनेचा व्हीडिओ इंटरनेटवर वेगाने पसरतो आहे. व्हीडिओच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी चालकाला अटक केली आणि गाडी जप्त केली आहे. व्हीडिओमध्ये अनेक विद्यार्थी आणि इतर लोक रस्त्याच्या कडेला उभे असलेले दिसत आहेत. त्यानंतर एक भरधाव वेगाने […]

अधिक वाचा...

पुराव्याअभावी कठोर कायदाही कुचकामी; पॉक्सो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

नवी दिल्ली: लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत एका खटल्यात निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, आरोपी दोषी असल्याची पक्की धारणा असण्याचा अर्थ असा नाही की, सत्र न्यायालयाने फिर्यादी पक्षाची बाजू अपरिहार्य सत्य म्हणून स्वीकारली पाहिजे. सबळ पुराव्याअभावी कठोर कायदाही कुचकामी ठरू शकतो, असे न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, […]

अधिक वाचा...

दिल्लीतून माजी सहकाऱ्याला भेटण्यासाठी गुरुग्रामला गेलेल्या व्यक्तीची हत्या; मृतदेह फेकला गटारात…

नवी दिल्ली: गुरुग्राममध्ये एक तातडीची बैठक असल्याचे सांगून, दिल्लीतील एका रेस्टॉरंटमधून आपल्या निघालेल्या युवराज सिंग मनचंदा (वय ३१) या तरुणाची, त्याची माजी महिला सहकारी आणि तिच्या जोडीदाराने त्याची हत्या केली. हत्येमागे आर्थिक वाद असल्याचे पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर सांगितले. तरुणाचा मृतदेह एका गटारात फेकून दिलेल्या अवस्थेत आढळला आहे. ६ सप्टेंबर रोजी, तो आपल्या बहिणींसोबत दिल्लीतील लाजपत […]

अधिक वाचा...

हरयाणाच्या माजी मंत्र्याच्या घर, कार्यालय आणि फार्महाऊसवर अंमलबजावणी संचालनालयाचे छापे; २४८ कोटींचा घोटाळा!

नवीन गुरुग्राम: अंमलबारी संचालनालयाने (ईडी) वाटिका लिमिटेडशी संबंधित कथित रिअल इस्टेट घोटाळा आणि मनी लाँडरिंग प्रकरणात, हरियाणाचे माजी राज्यमंत्री गोपाल कांडा यांच्याशी संबंधित गुरुग्राममधील तीन ठिकाणांवर छापे टाकले. ‘ईडी’ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) कलम १७ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. गोपाल कांडा यांच्या निवासस्थानी, फार्महाऊस आणि कार्यालयाच्या परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. […]

अधिक वाचा...

वैद्यकीय उपकरणांवर तब्बल २,८४१ टक्के नफा; तुकाराम मुंढे यांचे केंद्रीय यंत्रणांना पत्र

मुंबई: वैद्यकीय उपकरणांची मूळ खरेदी किंमत आणि त्यावर छापलेली कमाल विक्री किंमत (एमआरपी) यात प्रचंड तफावत आहे, असे महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासना’च्या (एफडीए) पाहणीत उघडकीस आले आहे. एका प्रकरणात ही नफ्याची टक्केवारी तब्बल २,८४१.१७ टक्क्यांपर्यंत पोचल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर, आवश्यक वैद्यकीय उपकरणांच्या किमती रास्त करण्यासाठी आणि दरांचे नियमन करण्यासाठी ‘एफडीए’ आयुक्त तुकाराम […]

अधिक वाचा...

तुकाराम मुंढे यांच्या पथकाचा मुंबईतील कॅफे मोंडेगरवर छापा; सुरक्षेतील त्रुटींमुळे परवाना निलंबित…

मुंबईः खाद्यविश्वातील एक महत्त्वाचे नाव असलेले दक्षिण मुंबईतील ‘कॅफे मोंडेगार’ आता तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) निशाण्यावर आले आहे. तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेतील त्रुटी आढळून आल्याने, एफडीएने छापा घालून जवळजवळ शंभर वर्षे जुन्या उपाहारगृहाचा परवाना निलंबित केला आहे. १९३२ मध्ये इराणी कॅफे म्हणून स्थापन झालेले, कुलाबा येथील हे उपाहारगृह, […]

अधिक वाचा...

इंस्टाग्रामवरून १५० अवैध पिस्तुले विकणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या ५ तस्करांना उत्तर प्रदेश एसटीएफकडून अटक…

लखनऊ: पोलीस आणि विशेष कृती दलाने (एसटीएफ) उत्तर प्रदेशातील अवैध शस्त्र तस्करी करणाऱ्या टोळ्यांविरुद्धची मोहीम अधिक तीव्र केली आहे. या कारवाईदरम्यान, एसटीएफने कुख्यात लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोई टोळ्यांशी संबंधित असलेल्या एका आंतरराज्य शस्त्र तस्करी सिंडिकेटचा पर्दाफाश करून, मंगळवारी गोरखपूरमध्ये पाच कुख्यात तस्करांना अटक केली. ही टोळी मध्य प्रदेशातील सेंधवा आणि हरियाणातील सोनीपत येथून अत्याधुनिक […]

अधिक वाचा...

बनावट नोटा बनविणाऱ्या टोळीचा बनावट नाण्यांची अवैध टांकसाळ; सहारनपूरमध्ये टोळी जेरबंद…

सहारनपूरः बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणणाऱ्या हरियाणातील सहारनपूर येथील एका टोळीने नाणी पाडण्याची अवैध टांकसाळ सुरू केली होती. नाण्यांची टंचाई लक्षात घेऊन त्यांनी ही नवी शक्कल लढविली, परंतु हा व्यवहार टोळीसाठी आतबट्ट्याचा ठरला आहे. टोळीचा म्होरक्या उपकार लुथरा याने कारस्थानाचे जाळे अधिक पसरविण्यासाठी तरुणांना कमिशन देण्याचा मार्ग अवलंबिला होता. मात्र, पोलिसांनी मागोवा घेऊन […]

अधिक वाचा...

रुग्णवाहिका आरटीओच्या रडारवर; आठ महिन्यांत ८२ रुग्णवाहिकांवर कारवाई…

मुंबईः आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो, अशा वेळी रुग्णाला रुग्णालयात पोचवणाऱ्या रुग्णवाहिकांपैकी ८२ रुग्णवाहिका नियमांचे उल्लंघन करताना आढळल्या आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) जानेवारी ते ऑगस्टदरम्यान शहरातील ४२७ रुग्णवाहिकांची तपासणी केली. या कारवाईत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ७९ हजारांहून अधिक दंड आकारण्यात आला असून यामुळे मुंबईतील रुग्णवाहिकांची तंदुरुस्ती (फिटनेस), सुरक्षितता आणि आपत्कालीन तयारी पुन्हा एकदा […]

अधिक वाचा...

अवघ्या ९० मिनिटांत दोन मैत्रिणींची हत्या करणाऱ्या भारतीय वंशाच्या महिलेला अमेरिकेत अटक…

सॅन होजे: अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये दोन मैत्रिणींच्या हत्येप्रकरणी भारतीय वंशाच्या एका महिलेला अटक करण्यात आली आहे. एका मैत्रिणीला चाकूने भोसकले तर दुसरीला आपल्या गाडीखाली चिरडून मारल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे या दोन्ही हत्या तिने अवघ्या ९० मिनिटांमध्ये केल्या आहेत, असे पोलिसांनी सांगितले. अनिला बेबी (वय ३२) हिने केरळममधील तिच्या दोन मैत्रिणी, ॲन मेरी मॅथ्यू आणि अंजना […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!