‘देवमाणूस’ फेम अभिनेत्याच्या भावाने केली आत्महत्या…
मुंबईः ‘देवमाणूस’ या मालिकेच्या माध्यमातून लोकप्रिय झालेला अभिनेता एकनाथ गीते याच्या विजू या धाकट्या भावाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे गीते याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेता एकनाथ गीते याने भावाच्या मृत्यूनंतर भावूक करणारी पोस्ट शेअर केली आहे. इतकंच नाही तर हा टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी माझ्याशी का बोलला नाहीस, असे म्हणत त्याने […]
अधिक वाचा...अभिनेत्री जया प्रदा यांच्या अटकेसाठी पोलिसांचे छापे…
नवी दिल्ली : ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांच्या अटकेसाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी मुंबई आणि दिल्ली येथे छापे टाकले आहेत. आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशमधील खासदार-आमदार जया प्रदा यांच्याविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. न्यायालयाने पोलिस अधीक्षकांना जया प्रदा यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे उत्तर […]
अधिक वाचा...ऑस्कर विनिंग अभिनेत्याचा कारमध्ये सापडला मृतदेह…
सेऊल (साऊथ कोरिया) : ऑस्कर विनिंग फिल्म पॅरासाइटमधील प्रसिद्ध अभिनेता ली सन क्युन (वय ४८) याचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीमध्ये आढळला आहे. त्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. ली सन क्युन ड्रग्ज आणि नशा असणाऱ्या औषधांचा वापर करत होता. सेंट्रल सोलच्या एका कार पार्किंगमध्ये एक व्यक्ती कथित स्वरूपात बेशुद्ध अवस्थेत सापडला. […]
अधिक वाचा...अभिनेता अजय देवगण अपघातात जखमी…
मुंबई : अभिनेता अजय देवगण सिंघम 3 च्या सेटवर एक अॅक्शन सीन शूट करताना जखमी झाला आहे. अजय देवगण याच्या डोळ्याला दुखापत झाली असल्यामुळे डॉक्टरांनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिल्यामुळे सिंघम 3 चे शूट रद्द करण्यात आले आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण सगळे अॅक्शन सीन स्वतः करतो. त्याला त्यासाठी बॉडी डबल वापरणे […]
अधिक वाचा...लक्ष्मीकांत बेर्डे यांचे बंधू अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन…
मुंबई : आपल्या अनोख्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते रविंद्र बेर्डे (वय ७८) यांचे आज (बुधवार) निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांना घशाच्या कर्करोगाचे निदान झाले होते. त्यांच्यावर मुंबईत टाटा रुग्णालयात उपचार सुरू होते. रवींद्र बेर्डे हे अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे भाऊ […]
अधिक वाचा...ज्येष्ठ अभिनेते ज्युनिअर मेहमूद यांचे निधन; शेवटची इच्छा…
मुंबई : हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते ज्युनिअर मेहमूद यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले. कर्करोगाशी त्यांची झुंज अपयशी ठरली. ज्युनिअर मेहमूद यांचे मित्र सलाम काजी यांनी ज्युनिअर मेहमूद यांच्या निधनाची माहिती दिली. ज्युनिअर मेहमूद हे त्यांच्या निवासस्थानीच होते. ज्युनिअर मेहमूद ऊर्फ मोहम्मद नईम यांनी आपल्या अभिनयाने आणि विनोदाने ७० च्या दशकात प्रेक्षकांचे मनोरंजन […]
अधिक वाचा...मुंबईत पॉर्न फिल्मचे शूटिंग सुरु असताना पोलिसांनी टाकली धाड…
मुंबई: एका अॅडल्ट फिल्मचे शूटिंग करताना आणि त्याचे ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग करताना पोलिसांनी धाड टाकली आणि तीन अभिनेत्यांना अंधेरी येथून अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये दोन महिला (20 आणि 34 वर्षे) आणि एका युवकाचा (वय 27) समावेश आहे. संबंधित अॅपवर या चित्रपटाचे लाईव्ह स्ट्रीमिंग करत होते. हे यूके स्थित ओन्लीफॅन्स प्लॅटफॉर्मसारखे आहे, जिथे मुले […]
अधिक वाचा...अभिनेत्रीचा आढळला मृतदेह; प्रेमसंबंधातून आत्महत्या…
मुंबई : प्रसिद्ध बांग्लादेशी अभिनेत्री हुमैरा हिमू (वय ३७) हिचा मृत्यू झाल्यामुळे चित्रपट सृष्टीत खळबळ उडाली आहे. तिच्या निधनाने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्रीने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. पोलिस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत. अभिनेत्री मृतावस्थेत आढळल्यानंतर तिला त्वरित ढाका येथील उत्तरा आधुनिक मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तिला तपासल्यानंतर […]
अधिक वाचा...‘बिग बॉस’ विजेता एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल; विषारी सापांचं विष…
मुंबईः ‘बिग बॉस ओटीटी’चा विजेता एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ड्रग्ज पार्ट्यांमध्ये विषारी सापांचे विष पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. एल्विशसह पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोएडामध्ये एल्विश विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिग बॉस विजेता बनल्यानंतर चर्चेत आलेला युट्यूबर एल्विश यादव अडचणीत सापडला आहे. नोएडा पोलिसांनी त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केला […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! गरोदर अभिनेत्रीने बाळाला न पाहताच घेतला जगाचा निरोप…
चेन्नईः मल्याळम मालिका चित्रपटांमध्ये अभिनय साकारणारी अभिनेत्री डॉ. प्रिया (वय ३५) हिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ती आठ महिन्यांची गरोदर होती. तिच्या निधनाने मल्याळम चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. प्रिया हिच्या निधनानंतर अनेकांनी तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेता किशोर सत्या याने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करुन प्रियाला श्रद्धांजली वाहिली आहे. […]
अधिक वाचा...
