काळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दोन घरफोडी चोरांना ठोकल्या बेड्या…

पुणे : काळेपडळ पोलिस स्टेशनच्या तपास पथकाने घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन सराईत चोरट्यांना अटक करून मुद्देमालासह जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, पोलिसांच्या या कामगिरीचे परिसरात कौतुक होत आहे. दि. ३१/०१/२०२६ ते दि. ०२/०२/२०२६ या कालावधीत गंगेश्वर यादव यांच्या तरवडेवस्ती, महंमदवाडी, हडपसर येथील बंद घराचा दरवाजाचा कोयंडा उपसून अज्ञात व्यक्तीने घरात […]

अधिक वाचा...

नाशिक जिल्ह्यातील युवतीच्या खुनाचा गुन्हा काही तासांतच उघड; प्रेमसंबंधातून हत्या…

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील वाडीवऱ्हे परिसरात आढळलेल्या युवतीच्या खुनाचा छडा पोलिसांनी अवघ्या काही तासांत लावला आहे. युवतीचा खून प्रेमसंबंधातून झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. आरोपी आणि मृत युवती दोघेही बुलढाणा जिल्ह्यातील असल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. नाशिकमधील वाडीवऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सारूळच्या जंगलात एका युवतीचा मृतदेह आढळून आला होता. घटनास्थळी कोणतेही स्पष्ट धागेदोरे नसतानाही पोलिसांनी […]

अधिक वाचा...

पुणे! शेअर मार्केटमधील गुंतवणुकदारांची कोटयावधी रुपयांची फसवणूक करणारा जेरबंद…

पुणे (संदिप कद्रे): शेअर मार्केटमधील गुंतवणुकदारांची कोटयावधी रुपयांची फसवणुक करुन ३ वर्षांपासून पाहिजे असलेल्या आरोपीस पोलिसांनी जेरबंद केले आहे. गुंतवणुकदारांना शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतुन चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवुन फिर्यादी व इतर ८९, सहकारी यांची माहे सप्टेंबर २०२१ ते ३१/१०/२०२३ या कालावधीमधे ३,३९,१२,६३७/- रुपयांची आर्थिक फसवणूक केलेल्या गुन्हयातील आरोपी भारत सोपान पठारे हा नाशिक भागात […]

अधिक वाचा...

पुणे! पोलिस आयुक्त कारवाईचा आढावा घेण्यासाठी स्वतः उतरले रस्त्यावर…

पुणे : पुणे शहरातील बुधवार पेठेतील रेड लाइट परिसरात पुणे पोलिसांनी छापेमारी करत कुंटणखान्यांमध्ये असलेल्या महिलांची पडताळणी केली. या कारवाई दरम्यान वेश्याव्यवसाय करत असलेल्या ११ महिला बांगलादेशी असल्याचे त्यांच्या कागदपत्रांच्या तपासणीतून उघड झाले. यानंतर पोलिसांनी संबंधित महिलांवर तसेच कुंटणखाना चालवणाऱ्यांविरोधात पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच या महिलांना बांगलादेशात परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात […]

अधिक वाचा...

पुणे! महिलेला लॉजवर नेतो म्हणत डोंगरावर नेले; पण पोलिसांनी पकडलेच…

पुणे : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका महिलेचा 6 जणांनी मिळून खून केल्याची घटना 10 फेब्रुवारी रोजी घडली होती. संशयित अवस्थेत आढळून आलेल्या या महिलेच्या मृत्यूचे गूढ उलगडले आहे. महिलेवर बलात्कार करून तिला मांगडेवाडी येथील दगडाच्या खाणीत ढकलून खून करण्यात आला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाणे येथे गुन्हा […]

अधिक वाचा...

पंढरपूरमधील दुहेरी हत्याकांडाची सूत्रे IPS प्रशांत डगळे यांनी हातात घेतली अन् ठोकल्या बेड्या…

सोलापूर: पंढरपूर शहरात घडलेल्या मायलेकाच्या निर्घृण दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरले होते. या घटनेनंतर तब्बल आठ महिने उलटूनही आरोपींचा छडा लागत नसल्याने पोलिसांवर प्रचंड दबाव होता. तपासासाठी आंदोलने झाली, तपास अधिकारी बदलले; मात्र या खुनाचे कोडे उलगडत नव्हते. अखेर या प्रकरणाचा तपास IPS अधिकारी प्रशांत डगळे यांच्याकडे आला आणि अवघ्या एका महिन्यात या दुहेरी हत्येचा […]

अधिक वाचा...

पुणे पोलिसांनी फिल्मी स्टाईलने आंध्र प्रदेशातून निलंबित पोलिसाला केली अटक…

पुणे: खाकी वर्दीचा धाक दाखवून आणि घरगुती अडचणींचे खोटे कारण सांगून अनेक महिला आणि व्यावसायिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणारा निलंबित पोलीस हवालदार गणेश अशोक जगताप (वय ५२) पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी आंध्रप्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातून फिल्मी स्टाईलने अटक केली आहे. गणेश जगताप याच्यावर पुणे शहरात फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. एका महिलेकडून १७ […]

अधिक वाचा...

पुणे! स्वारगेट स्टॅण्ड परिसरामध्ये मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी केले जेरबंद…

पुणे: पुणे शहरातील स्वारगेट स्टॅण्ड परिसरामध्ये मोबाईल हिसकावणाऱ्या दोन चोरट्यास स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी दोन गुन्हे उघडकीस आणले असून एकुण २,५७,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. स्वारगेट पोलिस ठाणे गु. र. नं. १४ / २०२६ भा. न्या. सं. कलम ३०४(२), ३(५) मधील एम. एच.-१२- यू / एल -५२०३ […]

अधिक वाचा...

लातूर जिल्ह्यात मटका व दारूबंदी गुन्ह्यांविरुद्ध पोलिसांची व्यापक व कठोर कारवाई…

लातूर (श्रीकांत मुंडे): लातूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच समाजात लपूनछपून सुरू असलेल्या मटका जुगार व अवैध मद्यविक्रीसारख्या बेकायदेशीर धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने लातूर जिल्हा पोलिस दलाकडून सातत्याने प्रभावी व कठोर कारवाया करण्यात येत आहे. पोलिस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली लातूर पोलिसांकडून तसेच […]

अधिक वाचा...

पुणे! प्रियकराला संपवलं पण सिग्रेट अन् दारुच्या बाटलीने अडकवलं…

पुणे: प्रियकराच्या सततच्या त्रासाला कंटाळून प्रेयसीने आपला मुलगा आणि त्याच्या मित्राच्या मदतीने प्रियकराची हत्या केल्याची घटना चाकण परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणात उत्तर चाकण पोलिसांनी तब्बल 20 दिवसांच्या तपासानंतर तिघा आरोपींना अटक केली असून, दारूच्या बाटल्या आणि सिगारेटच्या आधारे गुन्ह्याचा उलगडा केला आहे. मुंजा धोंडीबा नरहरे (वय 25) याचे उषा नानासाहेब चव्हाण (वय 40) […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!