एकोणिसाव्या मजल्यावरून पडल्याने गुरुग्राममध्ये एक मजूर मृत्यूमुखी; तर दुसरा गंभीर जखमी…
गुरुग्राम: बाजघेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेक्टर-११३ मध्ये बांधकाम सुरू असलेल्या स्मार्ट वर्ल्ड बिल्डिंगच्या १९ व्या मजल्यावरून पडून एका कामगाराचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. अपघातानंतर संतप्त कामगारांनी बिल्डर आणि कंत्राटदारावर निष्काळजीपणाचा आरोप करत गोंधळ घातला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी हस्तक्षेप करून मृतदेह ताब्यात घेतला, शवविच्छेदनासाठी पाठवला […]
अधिक वाचा...ग्रेटर नोएडामध्ये जीएनआयओटी महाविद्यालयाजवळ वेगवान गाडीखाली चिरडले गेले पाच विद्यार्थी…
ग्रेटर नोएडा: नॉलेज पार्क कोतवाली परिसरातील जीएनआयओटी महाविद्यालयाजवळ, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाच विद्यार्थ्यांना भरधाव गाडीने धडक दिली. घटनेचा व्हीडिओ इंटरनेटवर वेगाने पसरतो आहे. व्हीडिओच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी चालकाला अटक केली आणि गाडी जप्त केली आहे. व्हीडिओमध्ये अनेक विद्यार्थी आणि इतर लोक रस्त्याच्या कडेला उभे असलेले दिसत आहेत. त्यानंतर एक भरधाव वेगाने […]
अधिक वाचा...पुराव्याअभावी कठोर कायदाही कुचकामी; पॉक्सो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
नवी दिल्ली: लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत एका खटल्यात निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, आरोपी दोषी असल्याची पक्की धारणा असण्याचा अर्थ असा नाही की, सत्र न्यायालयाने फिर्यादी पक्षाची बाजू अपरिहार्य सत्य म्हणून स्वीकारली पाहिजे. सबळ पुराव्याअभावी कठोर कायदाही कुचकामी ठरू शकतो, असे न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, […]
अधिक वाचा...मुसळधार पावसामुळे मध्य प्रदेशातील नाल्याला आलेल्या पुरात ८ भाविक मृत्यूमुखी…
भोपाळ: मध्य प्रदेशातील आगर-माळवा जिल्ह्यातील नळखेडा येथील प्रसिद्ध माता बगलामुखी मंदिर परिसरात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे, मंदिराजवळून वाहणाऱ्या नाल्याला आलेल्या पुरात, प्रवाशांनी भरलेली एक गाडी वाहून गेली. या गाडीतील तीन मुले, तीन पुरुष आणि दोन महिलांसह आठ जण मृत्यूमुखी पडल्याचे वृत्त आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नाल्यातून […]
अधिक वाचा...दिल्लीतून माजी सहकाऱ्याला भेटण्यासाठी गुरुग्रामला गेलेल्या व्यक्तीची हत्या; मृतदेह फेकला गटारात…
नवी दिल्ली: गुरुग्राममध्ये एक तातडीची बैठक असल्याचे सांगून, दिल्लीतील एका रेस्टॉरंटमधून आपल्या निघालेल्या युवराज सिंग मनचंदा (वय ३१) या तरुणाची, त्याची माजी महिला सहकारी आणि तिच्या जोडीदाराने त्याची हत्या केली. हत्येमागे आर्थिक वाद असल्याचे पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर सांगितले. तरुणाचा मृतदेह एका गटारात फेकून दिलेल्या अवस्थेत आढळला आहे. ६ सप्टेंबर रोजी, तो आपल्या बहिणींसोबत दिल्लीतील लाजपत […]
अधिक वाचा...राजधानी पुन्हा हादरली! मित्रानेच तिला दगा; सामूहिक अत्याचार अन् निर्घुण हत्या…
नवी दिल्ली: एका १६ वर्षीय मुलीवर चार जणांनी सामूहिक अत्याचार करत तिची निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. सामूहिक बलात्कार आणि हत्येची ही घटना उघडकीस येताच संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी अवघ्या ७२ तासांत मुख्य आरोपीसह ४ जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. घटनेच्या दिवशी पीडित […]
अधिक वाचा...‘इन्शाअल्लाह’ म्हणाल्यामुळे बंगालच्या आयपीएस अधिकारी बुशरा बानो एका व्हीडिओमुळे अडकल्या वादात…
कोलकाताः पश्चिम बंगालमधील तरुण आयपीएस अधिकारी बुशरा बानो यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर त्या मोठ्या वादात सापडल्या आहेत. हा व्हिडिओ समोर आल्याच्या काही दिवसांतच, खरगपूरमधील अतिरिक्त पोलीस अधीक्षक पदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. संपूर्ण प्रकरण समजून घेण्यासाठी, २०२१ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी बुशरा बानो यांनी १३ सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर […]
अधिक वाचा...हरयाणाच्या माजी मंत्र्याच्या घर, कार्यालय आणि फार्महाऊसवर अंमलबजावणी संचालनालयाचे छापे; २४८ कोटींचा घोटाळा!
नवीन गुरुग्राम: अंमलबारी संचालनालयाने (ईडी) वाटिका लिमिटेडशी संबंधित कथित रिअल इस्टेट घोटाळा आणि मनी लाँडरिंग प्रकरणात, हरियाणाचे माजी राज्यमंत्री गोपाल कांडा यांच्याशी संबंधित गुरुग्राममधील तीन ठिकाणांवर छापे टाकले. ‘ईडी’ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) कलम १७ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. गोपाल कांडा यांच्या निवासस्थानी, फार्महाऊस आणि कार्यालयाच्या परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. […]
अधिक वाचा...विवाहित प्रेयसीला घेऊन गेला एकांतात अन् प्रेयसी किंचाळच लागली धावू…
भोपाळ (मध्य प्रदेश): एका युवकाने आपल्या विवाहित प्रेयसीला निर्जनस्थळी घेऊन जात तिला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना छत्तीसगड राज्याच्या रायपूर जिल्ह्यातील माना पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून, पुढील तपास करत आहेत. वीरू धीवर (वय २६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. राजकुमारी साहू असे हत्या झालेल्या विवाहित युवतीचे नाव आहे. […]
अधिक वाचा...इंस्टाग्रामवरून १५० अवैध पिस्तुले विकणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या ५ तस्करांना उत्तर प्रदेश एसटीएफकडून अटक…
लखनऊ: पोलीस आणि विशेष कृती दलाने (एसटीएफ) उत्तर प्रदेशातील अवैध शस्त्र तस्करी करणाऱ्या टोळ्यांविरुद्धची मोहीम अधिक तीव्र केली आहे. या कारवाईदरम्यान, एसटीएफने कुख्यात लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोई टोळ्यांशी संबंधित असलेल्या एका आंतरराज्य शस्त्र तस्करी सिंडिकेटचा पर्दाफाश करून, मंगळवारी गोरखपूरमध्ये पाच कुख्यात तस्करांना अटक केली. ही टोळी मध्य प्रदेशातील सेंधवा आणि हरियाणातील सोनीपत येथून अत्याधुनिक […]
अधिक वाचा...
