
पोलिस अधिकाऱ्याचा नायलॉन मांजामुळे कापला गेला गळा…
छत्रपती संभाजीनगर : कर्तव्यावर निघालेल्या पोलिस अधिकाऱ्याचा (पीएसआय) नायलॉन मांजामुळे गळा कापला गेला. बीड बायपास परिसरातील सुधाकरनगर मध्ये आज (मंगळवार) सकाळी दहा वाजता घडलेल्या घटनेत पीएसआय गंभीर जखमी झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी सचिन पारधे हे स्थानिक गुन्हे शाखेत अधिकारी आहेत. आज सकाळी दहा वाजता ते नेहमीप्रमाणे कर्तव्यावर दुचाकीने निघाले होते. सुधाकर नगर मधून जात असतानाच अचानक मांजाने त्यांचा गळा कापला गेला. स्थानिकांनी त्यांना तत्काळ एका खाजगी रुग्णालयात दाखल केले.
घटना इतकी गंभीर होती की पारधे यांच्या गळ्याला मांजा लागताच रक्ताच्या धारा निघाल्या. दुचाकीवरून तोल जाऊन ते खाली कोसळले. मांजा त्यांच्या गळ्यामध्ये अक्षरशः रुतला होता. तातडीने शस्त्रक्रिया शहानुरमिया दर्गा परिसरातील एका खाजगी रुग्णालयात पारधे यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती कळतच जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अप्पर अधीक्षक सुनील लांजेवार, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश वाघ यांनी रुग्णालयात धाव घेतली.
पुणे पोलिसांनी नायलॉन मांजाबाबात घेतला मोठा निर्णय…
पुणे शहरात नायलॉन मांजा ठरतोय जीवघेणा; पत्रकाराच्या पत्नीसह दोन महिला जखमी…
हृदयद्रावक! पोलिसकाकाचा मांजाने चिरला गळा…
सहकारनगर पोलिसांनी नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्याला केले जेरबंद…
मोठी बातमी! वाल्मिक कराड अडचणीत, मकोका अंतर्गत गुन्हा…

