Video: तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरीत 6 भाविकांचा मृत्यू…

तिरुपती: दक्षिण भारतातील तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी लाखो भाविक देशभरातून येत असतात. याच तिरुपतीच्या मंदिरात दर्शनसाठी टोकन घेण्यावरुन चेंगराचेंगरी झाली आणि यातच 6 भाविकांचा मृत्यू झाला आहे.

आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात बुधवारी वैकुंठ द्वार दर्शनासाठी टोकन घेण्यासाठी गर्दी उसळली, त्या दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 6 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. तिरुपती इथे विष्णू निवास आणि रामानायडू स्कूल परिसरात ही घटना घडली.

चेंगराचेंगरीमध्ये 26 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टोकन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक जमले असताना ही चेंगराचेंगरीची घटना घडली. काही भाविकांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली, पोलिसांनी समजवूनही धक्काबुक्की सुरू केली. त्यानंतर एका पोलिसाने लाठीचा धाक दाखवला, त्यानंतर भाविकांनी पोलिसांना ढकलून पुढे जायला सुरुवात केली. या दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमुळे 6 जणांचा जीव गेला आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही तिरुपती मंदिर संकुलात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले की, “मुख्यमंत्र्यांनी या घटनेत जखमी झालेल्यांना देण्यात येणाऱ्या उपचारांबद्दल अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी भेट देण्याचे आदेश दिले आहेत.

Video: मुंबईच्या वांद्रे रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी; पाहा जखमींची नावे…

हाथरस चेंगराचेंगरी! सत्संगवाला भोले बाबाच्या वहिनीने केला खुलासा…

उत्तर प्रदेशात सत्संगात चेंगराचेंगरीत १०७ जणांचा मृत्यू…

साऊथ सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन याला कोठडी…

जुळ्या मुलींच्या मारेकऱ्याला शोधून काढलं AI ने; 19 वर्षे होता फरार…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!