पुणे बसमध्ये महिला एक दोन मिनिट तर नुसती कानशिलातच लगावत होती…

पुणे : एका बसमध्ये महिलेची छेड काढल्यानंतर महिलेने रुद्रावतार दाखवल दारूड्याला चोप दिला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी घटनेची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

पुणे येथे एसटी बस मध्ये शिर्डी येथील एका शाळेत स्पोर्ट टीचर असलेली महिला आपल्या पती व मुलासह प्रवास करत होत्या. यावेळी मध्यधुंद अवस्थेत असलेल्या एका व्यक्तीने त्यांची छेड काढली. या घटनेनंतर महिलेने संबंधित व्यक्तीला चोप दिला आणि कडंक्टरला बस थेट पोलिस ठाण्यात नेण्यास सांगितली. त्यानंतर संबंधित तरूणाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीला बसमधून उतरायचे होते. यासाठी त्याने महिलेला चुकीच्या ठिकाणी स्पर्ष केला. महिलेने त्याची कॉलर धरून सपासप कानशिलात लगावल्या. साधारण एक दोन मिनिट तर महिला कानशिलातच लगावत होती. महिलेने नराधमला चोप चोपल्यानंतर कडक्टरला थेट गाडीत पोलिस ठाण्यात नेण्यास सांगितले. यानंतर या व्यक्तीला शनिवारवाड्याच्या समोरच्या पोलिस चौकीत घेऊन गेले. परंतु, पोलिस चौकीत एकही पोलिस कर्मचारी हजर नव्हता. जवळजवळ अर्धा तास महिलेने त्या व्यक्तीला पोलिस ठाण्यात डाबून ठेवले. काही वेळाने पोलिस चौकीत आले. त्यानंतर या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

संबंधित महिलेन पोलिसांना आपली कोणतीही तक्रार नसल्याचे लिहून दिले आहे. महिलेच्या हातून मार खाल्लेला मद्यपी हा मूळचा मंगळवार पेठेतील राहणारा आहे. संबंधित महिलेला बसमधून उतरताना आपला चुकून धक्का लागल्याचे त्यानेही पोलिसांना लिहून दिले आहे.

पुणे-सोलापूर रस्त्यावर लूटमार करायचे अन् पैसे कला केंद्रात उडवायचे; सहा जणांना अटक…

हृदयद्रावक घटनेने पुणे हादरले! नवजात बालकाच्या तोंडावर चक्क प्लास्टिकची पिशवी बांधली अन्…

पुणे! चुलत बहिणीसोबत सुरू असलेल्या प्रेमप्रकरणातून भावाची हत्या…

पुणे! वडिलांना ‘टकल्या’ म्हणाला म्हणून दगडाने ठेचून केला खून…

पुणे जिल्ह्यात पतसंस्थेच्या अध्यक्षा महिलेची चाकूने वार करून हत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!