
प्रेम प्रकरण! योगा टीचरला विवस्त्र करून जमिनीत पुरलं पण जिवंत बाहेर आली अन्…
बंगळूरू (कर्नाटक): महिला योगा टीचरला विवस्त्र करून तिचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला, पण योगा टीचरने श्वास रोखला आणि जीव वाचविण्यात यशस्वी झाली. प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याची माहिती चिकबल्लापूर पोलिसांनी दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
चिकबल्लापूरपासून 30 किमी अंतरावर निर्जनस्थळी 23 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली होती. गाडलेल्या खड्ड्यातून बाहेर येत महिलेने (वय ३४) गावकऱ्यांकडे मदत मागितली. गावकऱ्यांकडून कपडे मागितल्यानंतर थेट पोलिस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली. याप्रकरणी आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आली आहे.
चिकबल्लापूर येथे राहणाऱ्या बिंदू नावाच्या महिलेला तिच्या पतीचे योगा टीचरसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. महिलेने तिचा मित्र सतीश रेड्डी याला योगा टिचरवर लक्ष ठेवण्यास सांगितले. रेड्डीने 3 महिन्यांपूर्वी योगा टीचरकडून योगाचे वर्ग घेण्यास सुरुवात केली आणि विश्वास संपादन केला. 23 ऑक्टोबर रोजी तो योगा टीचरला घेऊन शहरात फिरायला गेला. शहरात फिरत असताना रेड्डी तिला शहराबाहेर एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला. यानंतर त्याने कपडे काढून तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. सतीश रेड्डीने केबलने गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. टीचरने आधी बेशुद्ध पडल्याचे नाटक केले. त्यानंतर तिने श्वासोच्छवासाचे विशेष तंत्र वापरून मृत्यूचे नाटक केले. रेड्डीने मृत समजून खड्ड्यात पुरले. यानंतर रेड्डीने आपल्या मित्रांच्या मदतीने योगा टीचरचे दागिने लुटले, माती टाकली आणि घटनास्थळावरून पळ काढला.
योगा शिक्षक गावकऱ्यांच्या मदतीने खड्ड्यातून बाहेर आल्याचे पोलिसांनी सांगितले. गावकऱ्यांकडून कपडे मागितले आणि नंतर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या प्रकरणी बिंदू, सतीश रेड्डीसह 6 जणांना अटक करण्यात आली आहे. पीडित योगा टीचरची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अपहरण, खुनाचा प्रयत्न आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
मुख्याध्यापकाला रंगेहाथ पकडल्यावर गावभर रंगली प्रेमाची चर्चा…
दिराने वहिनीला ओढलं प्रेमाच्या जाळ्यात अन् एक रात्री…
प्रेम! जवानाने मैत्रिणीला भेटायला बोलावले अन् निर्जन स्थळी घेऊन गेला…
प्रेम प्रकरण! पुणे जिल्ह्यात मैत्रिणीवरून युवकाने मारली दरीत उडी…
पोलिसांनी सुतावरून गाठवा स्वर्ग; दोघांचे एकाच महिलेसोबत होते प्रेमसंबंध…

