पुणे शहरातील नागरिकांनी टेकडीवर घडलेल्या गुन्ह्याबाबत काय काळजी घ्यावी? याबाबत सूचना…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहर पोलिस बाणेर पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या बाणेर टेकडी येथे घडलेले गुन्हेच्या अनुषंगाने नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे, पोलिसांची भूमिका व कर्तव्ये, बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुतारवाडी भागातील नागरिकांची सुरक्षितता याबाबत मुरकुटे गार्डन व सोलर गार्डन या ठिकाणी बाणेर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी भेट देऊन नागिरकांना सूचना दिल्या.

पोलिस आयुक्त यांनी दिलेल्या खालीलप्रमाणे सूचना नागरिकांना देण्यात आल्या त्या पुढीलप्रमाणे…
1. तात्काळ मदतीकरिता 24*7 कार्यरत असणारे helpline क्र 112 नंबर 100 नंबर
2. पुणे शहर पोलिस व्हाट्सअप ग्रुप क्रमांक
3. जेष्ठ नागरिक यांच्याकरिता बाणेर पो ठाणे क्रमांक व त्यांच्याकरिता राबविण्यात येत असलेली उपाययोजना
4. एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक यांची माहिती संकलन व मदत करणे
5. सायबर गुन्हे फसवणूक बाबत माहिती
6. बाणेर पोलिस ठाणेचा क्रमांक लोकेशन
7. बाणेर टेकडीवर जाणारे नागरिक यांचे करिता एकूण दहा ते बारा मार्गांवर सूचना फलक त्याचेवर अत्यावश्यक सेवा, बाणेर पोलिस ठाणे, पुणे शहर पोलिस आयुक्तालय यांचे क्रमांक व व्हाट्सअप ग्रुप क्रमांक
8. बाणेर परिसरामध्ये चालू करण्यात येणारे पोलिस मदत केंद्र
9. पुणे शहरातील सर्व टेकड्या या CCTV निगराणीखाली करण्याबाबत लावण्यात येणारे कॅमेरे बाबत माहिती
10. टेकड्यांवर लावण्यात येणारे PA सिस्टीम
11. ⁠AKSA LIGHTS
12. पोलिस गस्त , पोलिस SCANNER
13. बाणेर पोलिस ठाणे क्रमांक 74993 38203

याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. नमूद कार्यक्रमास एकूण 200 ते 300 नागरिक उपस्थित होते. शांततेत खेळीमेळीच्या वातावरणात बैठक पार पडली व नागरिकांनी सकारात्मक रित्या प्रतिसाद देऊन सायंकाळी 06.00 ते पहाटे 05.00 पर्यंत बाणेर टेकडीवर कोणीही जाऊ नये याबाबत सर्व नागरिकांमध्ये संदेश देऊन नागरिकांना स्वतःहून सूचना देणार असलेबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच PEOPLE AWARNESS बाबतचा पोलिसांचा जनतेशी संवादपर असलेला हा कार्यक्रम पुन्हा पुन्हा घेण्यात यावा याबाबत सूचना केलेली आहे.

पुणे शहरात बाणेर टेकडीवर महिलांना जबरदस्तीने लुटणारी टोळी जेरबंद…

पिट्याभाईला टेकडीवरील मुलींचे फेसबुक लाईव्ह भोवणार?

विद्यार्थ्यांना लुटणाऱ्या दोघांना चतुःश्रृंगी पोलिसांनी केली शिताफीतीने अटक…

बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला उत्तर प्रदेशातून उचललं तर तिसरा आरोपी…

मनोधैर्य योजना! ‘बोपदेव घाट’ प्रकरणातील पीडित युवतीला नुकसान भरपाई…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!