मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी…

पुणे : पुण्यातील एका नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्या प्रकरणी पुणे न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्यासह अन्य दोघांविरोधात पुण्यातील कोथरुड न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

न्यायालयातील सुनावणीला गैरहजर राहिल्याने मनोज जरांगे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. 2013 मध्ये मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका नाट्य प्रयोगाचे आयोजन केले होते. त्या नाट्य प्रयोगाची ठरलेली रक्कम न दिल्याचा आरोप नाट्यनिर्मात्याने केला होता.

2013 मध्ये पुण्यातील कोथरूड परिसरात जरांगे पाटील यांनी नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे दिले नाहीत, असा आरोप एका व्यक्तीने केला. या प्रकरणी जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात फसवणूक केल्याची तक्रार कोथरूड पोलिसात 2013 मध्ये दाखल करण्यात आली होती. त्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे सत्र न्यायालयामध्ये खटला चालू होता. या दरम्यान झालेल्या सुनावणीला मनोज जरांगे पाटील हजर राहिले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने जरांगे पाटील यांना दोनदा समन्स बजावला होते. या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीला जरांगे हजर राहिले नसल्यामुळे त्यांच्याविरोधात पुणे न्यायालयाने अटक वॉरंट काढले आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील हे सध्या अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल…

नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली SIT स्थापन…

पोलिस पाटलाने ग्रामपंचायतीमध्येच घेतला गळफास; व्हिडीओ म्हटले की…

IAS अधिकाऱ्याच्या पत्नीचे गुंडासोबत प्रेमसंबंध अन् नवऱ्याच्या घरासमोरच दिला जीव…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!