नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली SIT स्थापन…

नाशिक : राज्यातील आरक्षण आंदोलनादरम्यान गेल्या काही महिन्यांत झालेल्या हिंसक बाबींची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे.

राज्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलने झाली. या आंदोलनांदरम्यान काही ठिकाणी हिंसक आंदोलने झाली. या हिंसक आंदोलनांमुळे राज्यातील सामाजिक सलोख्याला बाधा पोहोचली. तसेच राजकीय वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न, सोशल मीडियाचा चुकीचा वापर, राज्यात दंगे भडकाविण्याचे प्रयत्न आदी मुद्दयांची चौकशी करण्यासाठी शासनाने एसआयटीमार्फत चौकशीचा निर्णय घेतला होता. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची या एसआयटी चौकशीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संदिप कर्णिक यासंदर्भात चौकशी करून तीन महिन्यात अहवाल शासनाला सादर करणार आहेत. यामुळे या चौकशीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानसभा अध्यक्षांकडून एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश
महाराष्ट्र विधानमंडळाच्या 2024 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आरक्षणादरम्यान झालेली हिंसा पूर्व नियोजित होती का? याबाबत चर्चा झाली. त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात यावी, असे निर्देश दिले होते. त्या निर्देशांनुसार नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

छगन भुजबळ म्हणाले, ‘चांगला निर्णय आहे, SIT नेमली आहे. कोणी दगड मारले किंवा मारायला लावले याचीही चौकशी व्हावी. संपूर्ण बीड पेटलं, आमदारांची घर पेटवली, शिक्षण संस्था पेटवल्या. मी आणि देवेंद्र फडणवीस यांचे टार्गेट होतो. अनेक बसेस पेटवल्या, कोण पेटवायला लावल्या, याची चौकशी झाली पाहिजे. निवडणुका जवळ आल्या आहेत. मराठा समाजाचे अनेक खासदार, मंत्री आहेत . मात्र, बोटावर माजण्या इतके जरांगे यांचे काही कार्यकर्ते भीती निर्माण करत आहेत. यासाठी सगळ शोधून काढलं पाहिजे. कोण आहेत हे दगड फेक करणारे लोक? अनेक लोक यामध्ये सहभागी आहेत.’

नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी हातात बॅट घेतली अन्…

नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली कोम्बिंग ऑपरेशन…

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचा ‘सुरक्षित नाशिक’ संकल्पनेवर भर…

नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या धडाकेबाज कारवाया सुरू…

पुणेकरांची मनं जिकली! संदीप कर्णिक नाशिकचे नवीन पोलिस आयुक्त!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!