एक-दोन नव्हे तर ५० पेक्षा जास्त जणांसोबत महिलेने केले लग्न…

चेन्नई (तमिळनाडू): एका महिलेनं 50 पेक्षा जास्त पुरुषांशी विवाह करून त्यांची फसवणूक केली आहे. विवाहानंतर त्यांच्या घरांतून रोख रक्कम आणि दागिने लांबवले आहेत. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाली असून, संबंधित आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

एका महिलेने 50 पेक्षा जास्त पुरुषांशी विवाह केला तर काहींची फसवणूक करत त्यांच्या घरातून रोख रकमेसह दागिने लंपास केले. या प्रकरणी तिरुपूर येथील महेश अरविंद नावाच्या व्यक्तीने महिलेविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनंतर ही महिला फरार होती. पण पोलिसांनी तिला अटक केली आहे.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेचे नाव संध्या असून, ती अविवाहित पुरुषांचा शोध घेत असे. त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीनं ती त्यांना स्वतःकडे आकर्षित करत असे. ती त्यांच्याशी लग्न करायची किंवा लग्नाचे आमिष दाखवायची नंतर त्यांच्याकडील रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू चोरून फरार व्हायची. या महिलेच्या फसवणुकीला आत्तापर्यंत 50 पेक्षा जास्त पुरुष बळी पडले आहेत. महिलेला अटक केली असून, तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर तिची तुरुंगात रवानगी करण्यात आली.

तक्रारदार महेश अरविंद (वय 30) यांनी सांगितले की, ‘माझे कुटुंबीय माझा विवाह करू इच्छित होते. ते वेगवेगळ्या माध्यमातून मुलीचा शोध घेत होते. यादरम्यान माझी एका मोबाईल अॅपच्या माध्यमातून इरोड जिल्ह्यातील कोडुमुडी जिल्ह्यातील संध्या नावाच्या महिलेशी ओळख झाली. सुरुवातीला आमच्यामध्ये संवाद सुरू होता. दरम्यान आम्ही प्रेमात पडलो. पलानी जवळच्या एका मंदिरात जाऊन आम्ही विवाह केला. विवाहानंतर मी संध्याला घेऊन घरी आलो. पण तिचं वर्तन मला संशयास्पद वाटत होते. मी जेव्हा तिचं आधार कार्ड पाहिलं तेव्हा त्यावर संध्याऐवजी चेन्नईतील एका महिलेचे नाव लिहिलेले होते. तिचे वय देखील जास्त होतं. मी याबाबत विचारले असता संध्या नाराज झाली आणि माझ्या कुटुंबियांना धमकी देऊ लागली.’

अहमदनगर जिल्ह्यात सिमरनने 8 महिन्यांत केली 9 लग्न; अखेर डाव फसला…

नवरा तिसरं लग्न करत असतानाच दोघी मंडपात पोहोचल्या अन्…

पत्नी पाचव्यांदा लग्न करत समजल्यावर चौथ्या पतीने उचलले मोठे पाऊल…

धक्कादायक! लग्नानंतर नवरीने पाचव्या दिवशीच दाखवला खरा चेहरा…

धक्कादायक! लग्नानंतर 7व्या दिवशी प्रियकरासह पळाली नवरी; जाण्यापूर्वी..

राजाबाबू! डॉक्टर तर कधी अधिकारी सांगून 6 महिलांशी केली लग्न अन्…

दोघांना सोडलं, तिसऱ्याची हत्या अन् चौथं लग्न करायला निघाली…

पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!