पुणे शहरात सराईत गुन्हेगाराकडून एक पिस्टल व दोन राऊंड जप्त…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात सराईत गुन्हेगाराकडून एक पिस्टल व दोन राऊंड जप्त करण्यात गुन्हे शाखा, युनिट-३ ला यश आले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

गुन्हे शाखा युनिट ३, पुणे कडील सहायक पोलिस फौजदार सुनिल पवार यांना मिळालेल्या माहिती वरून सराईत गुन्हेगार जयेश विजय लोखंडे (वय २४ वर्षे, रा. २२४, मंगळवार पेठ, पुणे) यास दिनांक १८/०६/२०२४ रोजी १५.१० वा. कै.धोंडिबा गुणाजी बने रोडवरील जवळील फर्ग्युसन कॉलेजच्या बंद असलेल्या गेट क्रमांक ३ जवळ, शिवाजीनगर पुणे येथे पकडून त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल, दोन राऊंड असा एकुण ४१,०००/- रू किंमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे.

आरोपी हा पोलिस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून तो नेहमी घातक शस्त्रे बाळगत असतो. त्याचेविरूध्द मोका, दरोडा, दरोडयाची तयारी, जबरी दुखापत, दुखापत, बेकायदेशीर जमाव जमविणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपी हा अलंकार पोलिस ठाणे गुन्हा रजि. नंबर ९० / २०२४ आर्म अॅक्ट ३२५ महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ ( १ ) सह १३५ या गुन्हयामध्ये पाहीजे आरोपी असून त्यास नमुद गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी ही पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सह-आयुक्त प्रवीण पवार, पुणे शहर, अपर पोलिस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, पुणे शहर पोलिस उप-आयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे पुणे शहर सहा. पोलिस आयुक्त, गुन्हे – १, सुनिल तांबे पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-३ चे प्रभारी अधिकारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगराव पवार, पोलिस अंमलदार सुनिल पवार, शरद वाकसे, पांडूरंग कामतकर, केदार आढाव, संजिव कळंबे, ज्ञानेश्वर चित्ते, साईनाथ पाटील, सतीश कत्राळे, राकेश टेकावडे, गणेश शिंदे, सोनम नेवसे यांचे पथकाने केली आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण हे करीत आहेत.

Video: पुणे शहरातील युवतीचा रील्ससाठी जीवघेणा स्टंट…

Video: पुणे शहर पोलिसांकडून फॅक्टरीवर छापा; लाखो रुपयांचा गुटखा जप्त…

पुणे शहरात अल्पवयीन मुलांकडून रॉडने हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न अन्…

पुणे अपघात! निबंध लिहण्याची ‘कठोर’ शिक्षा देणारे चौकशीच्या कचाट्यात…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!