
उजनी धरणात बोट उलटल्याने पाच जण बुडाले…
सोलापूर: उजनी धरणात प्रवासी वाहतूक करणारी बोट उलटल्याने पाच जण बुडाले असून, त्यामध्ये दोन बालकांचा समावेश आहे. धरणात बुडालेल्या सहा जणांचा शोध घेण्याकरिता रात्रभर शोधकार्य सुरू राहिले. सलग दुसऱ्या दिवशी आज शोधकार्य सुरू आहे. बोटीत राहुल डोंगरे हे पोलिस उपनिरीक्षक होते. त्यांनी बोट उलटल्यानंतर धाडसाने पोहत धरणाचा काठ गाठून जीव वाचवला. बोटमधील वाचलेल्या तरुण पोलिस अधिकाऱ्यानं ग्रामस्थांना आणि स्थानिक प्रशासनाला माहिती दिल्यानंतर घटना उघडकीस आली आहे
गोकूळ दत्तात्रय जाधव (वय ३०), कोमल गोकूळ जाधव (वय २५), शुभम गोकूळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकूळ जाधव (वय ३, रा. झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर), कुगाव येथील अनुराग अवघडे (वय ३५) व गौरव डोंगरे (वय १६), अशी बोट उलटून बुडाल्यांची नावे आहेत.
सोलापूर आणि पुणे जिल्ह्यामध्ये उजनी धरणात कुगाव (ता. करमाळा जि सोलापूर) ते कळाशी (ता. इंदापूर जि पुणे) या दरम्यान प्रवाशी बोट उलटली आहे. वादळी वारा आल्याने प्रवासी बोट हेलकावे खात उलटली. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगाव येथून ही बोट इंदापूर तालुक्यातील कळाशी या गावाकडे जात होती. बोट मध्ये कुगाव व झरे (ता. करमाळा) येथील सात प्रवासी होते. बोट धरणातून इंदापूरकडे जाताना जोरदार वादळी वारा सुटला. वाऱ्यामुळे बोट हेलकावे खात पाण्यात उलटली. कुगाव (ता करमाळा, जि सोलापूर) ते कळाशी (ता इंदापूर, जि सोलापूर) दरम्यान दररोज या बोटीने प्रवासी वाहतूक केली जाते. दिवसातून साधारणतः ही बोट १० ते १५ फेऱ्या मारते. मात्र, मंगळवारी सायंकाळी बोट बुडून मोठी दुर्घटना घडली.
दरम्यान, उजनी धरणात यापूर्वीही 10 डॉक्टर मित्रांसोबत गेले असताना सेल्फी घेताना दुर्घटना घडली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा उजनी धरणात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. याआधीही उजनी धरणामध्ये आजोती येथे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होडी उलटून चार डॉक्टर बुडाले होते. अकलूज, नातेपुते आणि माळशिरस परिसरातले 10 डॉक्टर नौकायानासाठी आले असताना ही दुर्घटना घडली होती.
#WATCH | Maharashtra: Search and rescue operation underway for the six people who went missing after a boat capsized last evening in Ujani dam waters near Kalashi village, close to Indapur Tahseel of Pune district. pic.twitter.com/J99EmOM25X
— ANI (@ANI) May 22, 2024
सहलीची नाव उलटून १२ विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांचा मृत्यू…
अहमदनगर जिल्हा हादरला! मांजरीमुळे एकाच कुटुंबातील सहा जण बुडाले…
हृदयद्रावक! एकमेकांना मिठी मारल्याने चौघांचा बुडून मृत्यू…
हृदयद्रावक! तलावाजवळ मुलांची कपडे दिसली अन् फुटला हंबरडा…
पुणे जिल्ह्यातील भाटघर धरणात बुडून वडील आणि मुलीचा मृत्यू…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

