डॉक्टर पत्नीला दोन युवकांसोबत नको त्या अवस्थेत रंगेहात पकडले…

लखनौ (उत्तर प्रदेश) : एका डॉक्टरने आपल्या डॉक्टर पत्नीला तिच्या दोन प्रियकरांसोबत हॉटेलमधील रूममध्ये नको त्या अवस्थेत रंगेहात पकडले. या घटनेनंतर डॉक्टर पती आणि त्याच्या कुटुंबीयांनी पत्नी आणि तिच्या दोन प्रियकरांना बेदम मारहाण केल्याची घटना कासगंज जिल्ह्यात घडली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत महिला आणि तिच्या दोन प्रियकरांना ताब्यात घेतले. शांतता भंग केल्याच्या आरोपावरून दोन्ही प्रियकरांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘डॉक्टर पती-पत्नीमध्ये गेल्या दोन वर्षांपासून वाद सुरू होता. दोघेही वेगळे राहतात, डॉक्टर पत्नी कासगंज जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात तैनात आहे. महिला डॉक्टरचा पती बऱ्याच दिवसांपासून पत्नीवर लक्ष ठेवून होता. बुधवारी एका हॉटेलमध्ये महिला डॉक्टरला दोन युवकांसह रंगेहात पकडण्यात आले.’

डॉक्टर पतीला हा प्रकार कळताच त्यांनी संपूर्ण कुटुंबासह हॉटेल गाठले आणि तिघांनाही खोलीच्या आत पकडले. यानंतर जोरदार हाणामारी झाली. पतीने सांगितलं की, ‘2013 मध्ये लग्न झाले होते. त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे समजल्यानंतर समजावून सांगितले. पण, तिने मला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. पुढे तर पत्नी दुसरीकडे राहायला लागली.’ दरम्यान, संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परिसरात चर्चांना उधाण आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नवऱ्याला मेहुणीसोबत नको त्या अवस्थेत पकडले अन् बसला धक्का…

सातारामध्ये मित्रासोबत लॉजवर जाताना रंगेहाथ पकडले अन्…

नात्याचा शेवट! अल्पवयीन दीर आणि वहिनीला रंगेहाथ पडकले…

प्रियकराला रंगेहाथ पकडल्यानंतर गावकऱ्यांचा चढला पारा अन्…

Video: नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये रंगेहात पकडलं अन् पुढे…

संतापजनक Video! पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले अन् पुढे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!