लग्न ठरलेल्या युवतीचा गळा चिरून खून…

पाटणा (बिहार) : बिहारमधील गोपालगंजमधील गोपाळपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील रतनपुरा गावात युवतीच्या खुनाची घटना घडली आहे. पिंकी कुमारी असे मृत युवतीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पिंकी बेपत्ता होती. शुक्रवारी रात्री ती घरी परत आली नाही म्हणून घरच्यांनी तिचा शोध घेतला. शनिवारी देखील तिचा पत्ता लागला नाही. त्यामुळे दुपारी पोलिस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली गेली. पोलिसांनी शोध सुरू केल्यानंतर त्यांना संध्याकाळी मुलीचा मृतदेह आमराईत आढळळा. तिच्या गळा चिरून खून करण्यात आला होता. तिच्या अंगावरही चाकूचे घाव होते. त्यानंतर पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पिंकी कुमारीचं लग्न ठरले होते. ती दररोज तिच्या होणाऱ्या पतीशी फोनवर बोलत असे.’

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी तिच्या होणाऱ्या पतीचा फोन आला नव्हता. लवकरच या खूनाचा उलगडा होईल. घटनास्थळावरील रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. आजूबाजूच्या परिसरात टॉवर डंप करून संशयितांचा शोध घेण्यात आला. एसडीपीओ प्रांजल या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

महिलेला अंघोळ करताना पाहण्यासाठी छतावर चढला अन्…

Video : बिकिनी घालून युवती चढली बसमध्ये चढते तेंव्हा…

क्ररता! युवतीचे फेविक्विकने चिटकवले ओठ; जखमेवर मिरची पावडर…

संतापजनक! युवतीच्या आईला हॉट्सऍपवरून पाठवला बलात्काराचा व्हिडिओ…

Video: युवतीसोबत डान्स करणं होमगार्डला पडलं महागात…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!