
मनोज जरांगे यांच्या सभेची परवानगी पोलिसांनी नाकारली…
बीडः लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असल्याचे कारण देत बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे आयोजित मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्याने याविरोधात संयोजकांनी थेट औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे.
परळी वैजनाथ येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मार्केट यार्डात जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज (बुधवार) सायंकाळी 6 वाजता बैठक बोलावली आहे. या बैठकीची जनतेला माहिती व्हावी, यासाठी संयोजकांनी परळी शहर आणि संभाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षकांकडे ऑटोरिक्षावर ध्वनिक्षेपक वाजविण्यासाठी 13 मार्च रोजी रीतसर अर्ज केले होते. पोलिसांनी 16 मार्चला काही अटी शर्ती घातल्या. याविरोधात संयोजकांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला होता. पण, लोकसभेची आचारसंहिता लागू झाली असल्याने जात, धर्म, भाषेवर एकत्र येऊ नका, असा आदेश देण्यात आला. त्यामुळे या नोटीसला सभेचे संयोजक दत्तात्रय विठ्ठलराव गव्हाणे आणि व्यंकटेश शिंदे यांनी अॅड. सुदर्शन साळुंके यांच्यामार्फत खंडपीठात आव्हान दिले आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यात मनोज जरांगे यांच्यावर 2024 मध्ये एकूण आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मागील आठवड्यात दोन दिवसांत पाच गुन्हे जरांगे यांच्यावर बीडमध्ये दाखल झाले आहेत. सोबतच मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या जेसीबीवर देखील पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. यासाठी पोलिसांनी जेसीबी चालक आणि मालकांचा शोध सुरु केला आहे.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाबाबत आंतरवाली सराटीमध्ये 24 मार्च रोजी महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला राज्यभरातील आणि इतर राज्यातील मराठा बांधव उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, राज्यात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू आहे, त्यामुळे या बैठकी बाबत पोलिस काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल…
मनोज जरांगे यांचे सहकारी पोलिसांच्या ताब्यात; संचारबंदी, बस पेटवली, इंटरनेट बंद…
नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली SIT स्थापन…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

