
बारगर्लच्या प्रेमात पडला अन् होस-मौज पुरविण्यासाठी युवक…
छत्रपती संभाजीनगर : डान्सबारमधील बारगर्लच्या प्रेमात पडल्यानंतर युवकाने तिची हौस मौज पुरवण्यासाठी अनेक शहरांमध्ये घरफोड्या केल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. त्याने मुंबई, पुणे आणि कोकणही गाठले. छत्रपती संभाजीनगरमध्ये २ तासात तीन घरे त्याने फोडली. मुंबईतून त्याला अटक करण्यात आल्यानंतर त्याच्याकडे केलेल्या चौकशीनंतर पोलीसांनाही धक्का बसला. पोलिस पुढील तपास करत आहेत.
रोहित उर्फ अरहान शेट्टी (वय २४) असे आरोपीचे नाव आहे. ७ फेब्रुवारीला त्याने फक्त अर्ध्या तासात तीन घरफोड्या केल्या. एका घरात १२ तोळ्यांचे दागिने, अडीच किलो चांदी आणि २ लाखांची रोकड लांबवली. त्याने घरातून जाताना लोखंडी सळी सोफ्यावरच ठेवली होती. तर दुसऱ्या दोन ठिकाणी साडेचार तोळे सोने आणि ६ तोळे सोने चोरी झाले होते. पोलिसांनी घरफोडीच्या घटनेनंतर वेगाने तपास सुरू केला. घरफोडीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्यातून या सर्व चोऱ्या रोहित शेट्टीनेच केल्याचं उघड झाले होते. त्याच्या शोधासाठी विविध भागात पोलिसांचे पथक रवाना झाले होते. शेवटी मुंबईत त्याला अटक करण्यात आली.
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
रोहित रिक्षा चालवण्याचे काम करत होता. एका बारगर्लच्या प्रेमात पडल्यानंतर तिच्यावर होणाऱ्या खर्चासाठी घरफोडी करायला सुरुवात केली. २०१७ मध्ये वयाच्या १७व्या वर्षी त्याने पहिल्यांदा घर फोडले होते. त्यानंतर तो फिरायला गेल्यानंतर पुणे आणि कोकणातही अनेक ठिकाणी घरफोड्या केल्या होत्या.
छत्रपती संभाजीनगरमध्ये ७ फेब्रुवारीला त्याने दिवसभर रिक्षाने फेरफटका मारला. यावेळी रेकी करत कोणती घरे फोडायची हे ठरवले. कमी वर्दळीचा परिसर, सुरक्षा रक्षक नसलेली अपार्टमेंट हेरली आणि काही वेळातच त्याने ३ घरे फोडली. गुन्हा केल्यानंतर त्याने थेट मुंबई गाठली होती. पण, पोलिसांनी तपास करत त्याला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.
Video: युवतीसोबत डान्स करणं होमगार्डला पडलं महागात…
मेहुणीने केलेला इशारा दाजीला पडला महागात…
भाजपचा नगरसेवक बारमध्येच अडकला पोलिसांच्या जाळ्यात…
पाचगणीमध्ये रिसॉर्टवर पोलिसांचा छापा; बारबालांसह 48 जण ताब्यात…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

