
येरवडा पोलिसांनी मोक्कातील पाहिजे आरोपीला केले जेरबंद…
पुणे (संदिप कद्रे): मोक्कातील पाहिजे आरोपी येरवडा तपास पथकाने जेरबंद केले आहे. सदर आरोपीस पुढील कारवाईसाठी लोणीकंद पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
येरवडा पोलिस स्टेशन कडून लोणीकंद पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं. ९३३ / २०२३ भा.दं.वि.कलम ३२५,३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३(२), ३(४), गुन्हयातील पाहिजे आरोपी ईस्माईल मैनुद्दीन शेरीकर याचा शोध घेत असताना ०९/०३/२०२४ रोजी श्रेणी पोउपनि प्रदिप सुर्वे, बीट मार्शल अंमलदार नटराज सुतार व काशिनाथ गद्दे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी हा येरवडा भागात येणार आहे.
सदरची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक येरवडा पोलिस स्टेशन यांना कळविल्याने त्यांनी मिळालेली माहिती वरुन कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले त्याप्रमाणे तेथे तपास पथक अधिकारी, अंमलदार व बीट मार्शल अंमलदार यांनी जावून सदर आरोपीस पळून जात असताना अतिशय शिताफीने पकडले. ईस्माईल मैनुद्दीन शेरीकर (वय २१ वर्षे रा स नं १२ लक्ष्मीनगर येरवडा पुणे) असे आरोपीचे नाव आहे. त्याचेबाबत लोणीकंद पोलिस स्टेशनकडील अभिलेखाची पडताळणी केली असता सदरचा आरोपी वरिल गुन्हयामध्ये पाहिजे आरोपी असलेबाबत माहिती प्राप्त झाली. सदर आरोपीस पुढील कारवाईसाठी लोणीकंद पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मनोज पाटील, अपर पोलिस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, विजयकुमार मगर, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ – ४, संजय पाटील सहा. पोलिस आयुक्त, येरवडा विभाग, संतोष पाटील, वपोनि येरवडा, आशालता खापरे, पोनि गुन्हे, येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोउपनि स्वप्निल पाटील, श्रेणी पोउपनि प्रदिप सुर्वे, पोहवा गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, अमजद शेख, कैलास डुकरे, पोना सागर जगदाळे, पोअं अनिल शिंदे, सुरज ओंबासे, विठ्ठल घुले, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले यांनी केलेली आहे.
पुणे शहरातील पोलिसकाकाने रेल्वेखाली उडी घेऊन घेतला जगाचा निरोप…
Video: पुणे शहरात टोळक्याने भररस्त्यात तिघांना कोयत्याने सपासप कापलं…
पुणे शहरात तोतया पोलिसाकडून पोलिस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की…
दुहेरी खुनातील पाहिजे आरोपीला येरवडा पोलिसांनी केले जेरंबद…
येरवडा तपास पथकाने चोरी करणाऱ्यास २४ तासात केले जेरबंद…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

