
Video: पुणे शहरात टोळक्याने भररस्त्यात तिघांना कोयत्याने सपासप कापलं…
पुणे : पुणे शहरातील खडकवासला भागात काही गुंडांनी तीन जणांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
गोऱ्हे बुद्रुक गावात 10-12 जणांच्या टोळक्याने कोयते-तलवारीने 3 जणांवर हल्ला केला असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. भररस्त्यात हल्ला करण्यात आला आहे. टोळक्याने धावत येत दुचाकी अडवली आणि त्यानंतर गाडीवरील युवकांवर कोयता आणि तलवारीने वार करत त्यांना जखमी केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हल्ल्याची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
संबंधित घटना 6 मार्च रोजी रात्री घडली आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला काही लोक धावत येत रस्त्यावर एका गाडीची वाट बघत असल्याचे दिसते. ही गाडी समोर येताच हे गुंड गाडी अडवून त्यावर बसलेल्या युवकांवर कोयता आणि तलवारीने हल्ला करताना दिसत आहेत.
पुणे शहरात टोळक्याने भररस्त्यात तिघांना कोयत्याने सपासप कापलं…https://t.co/42LUDp6Iqz pic.twitter.com/gAScoV73tU
— policekaka News (@policekaka) March 7, 2024
पुणे शहरात पोलिसांसमोरच कोयता गँगने युवकांवर केला हल्ला…
पुणे शहरात कोयता गँगकडून व्यवसायिकाची हत्या; Video Viral…
Video: पुणे शहरातील कोयता गॅंगच्या दहशतीचा व्हिडीओ व्हायरल…
Video: पुणे शहरात कोयता गॅंगने काढले पुन्हा डोके वर…
पुणे शहरात कोयता गँगने काढले पुन्हा डोके वर; पोलिसांनी काढली धिंड…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

