कोंढवा पोलिसांनी नामांकित कंपनीतील चोरीचा गुन्हा केला उघड…

पुणे (संदिप कद्रे): कोंढवा पोलिसांच्या तपास पथकाने कौशल्यपुर्ण तपास करुन नामांकित कंपनीतील घरफोडी चोरीचा गुन्हा उघड केला आहे. २ लॅपटॉप, कंपनीचा अत्यंत महत्त्वाचा डाटा असलेल्या २ हार्ड डिस्क व १ मोबाईल असा १०० टक्के मुद्देमाल जप्त केला असून, पुढील तपास करत आहेत.

कोंढवा पोलिस स्टेशन गु.र.नं. १९९/२०२४ भा.दं.वि. कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे दाखल गुन्ह्यातील फिर्यादी यांनी त्यांचे ओम मेटालॅब सर्विस प्रा. लि. या कंपनीमध्ये चोरी झालेबाबत २३/०२/२०२४ रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक व मानसिंग पाटील, पोलिस निरीक्षक गुन्हे कोंढवा पोलिस स्टेशन, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली तपासपथकाचे सहा पो निरीक्षक दिनेशकुमार पाटील व पोलिस अंमलदार यांनी दाखल गुन्ह्याचा तपास करीत असताना सदरचा दाखल गुन्हा कोणीतरी माहितगारानेच केला असावा त्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषण केले.

आरोपी रोशन शंकर सणस (वय २३ वर्षे रा. मु. वेरुळी, पो. मांढरदेवी, ता. वाई, जि. सातारा) यास ताब्यात घेवुन दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल तपास करीत असताना त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल करुन, त्याने चोरी करुन नेलेला एकुण ८७,०००/- रु. किंमतीचा माल त्यामध्ये दोन लॅपटॉप, एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल व दोन संगणकाच्या हार्डडिस्क हा त्याचे राहते घरी लपवुन ठेवलेला असताना तो काढुन दिल्याने त्यास दाखल गुन्ह्याचेकामी अटक करण्यात आली आहे.

संबंधित कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, प्रविण पवार, सह पोलिस आयुक्त, मनोज पाटील, अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, आर. राजा, पोलिस उप-आयुक्त परि. ०५, गणेश इंगळे, सहा. पोलिस आयुक्त, वानवडी विभाग, संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोंढवा पोलिस स्टेशन, मानसिंग पाटील, पोलिस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलिस स्टेशन येथील तपास पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक दिनेशकुमार पाटील, सहा. पोलिस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलिस उप निरीक्षक वैभव सोनवणे, पोलिस हवालदार विशाल मेमाणे, सतिश चव्हाण, लवेश शिंदे, निलेश देसाई, पोलिस अंमलदार शाहीद शेख, संतोष बनसुडे, सुजित मदन, सुरज शुक्ला, लक्ष्मण होळकर यांच्या पथकाने केली आहे.

शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्याला कोंढवा पोलिसांनी केली अटक…

पुणे शहरात पिस्टल बाळगणाऱ्यास कोंढवा पोलिसांनी केली अटक…

कोंढवा पोलिसांनी सराईत गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या; पिस्टल, काडतुसे जप्त…

कोंढवा पोलिसांनी मोक्कामधील फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या…

कोंढवा पोलिसांनी तडीपार आरोपीला कोयत्यासह केले जेरबंद…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!