
पिट्याभाईला टेकडीवरील मुलींचे फेसबुक लाईव्ह भोवणार?
पुणे : पुणे शहरातील अराई टेकडीवर अल्पवयीन मुलींनी नशा केल्याचा आरोप अभिनेते रमेश परदेशी यांनी केला होता. हे आरोप करताना रमेश परदेशी यांनी फेसबुक लाईव्ह केलं, पण हेच फेसबुक लाईव्ह रमेश परदेशी यांच्यासाठी अडचणीचे ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या मुली अल्पवयीन आहेत, पण तरीही त्यांचा चेहरा ब्लर न करता रमेश परदेशी यांनी व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. याप्रकरणी रमेश परदेशी यांच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अभिनेते रमेश परदेशी यांनी फेसबुक लाईव्ह वरून हा व्हिडिओ शेअर केला होता. यात एक मुलगी नशेत बडबड करत आहे तर दुसरी मुलगी बेशुद्ध पडली आहे, असा दावा रमेश परदेशी यांनी केला. टेकडीवर वॉकसाठी आलेलो असताना आम्हाला या मुली दिसल्या, त्यांना आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहे, असे रमेश परदेशी यांनी लाईव्हमध्ये सांगितले होते.
रमेश परदेशी यांच्याविरोधात नेहा पुरव यांनी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच या मुलींनी ड्रग्स घेतले नव्हते, तर पोटात अन्न नसताना बिअर प्यायल्यामुळे नशेत असल्याचे पोलिसांनी आपल्याला सांगितल्याचेही नेहा पुरव म्हणाल्या आहेत. त्या म्हणाल्या, ‘एक महिला म्हणून आणि एका मुलीची आई म्हणून मी या प्रकाराने खूपच अस्वस्थ झाले आहे. पुण्यात दोन मुली नशेच्या अमलाखाली so called संस्कृती रक्षकांना आढळून आल्या. सगळ्यात आधी त्या मुलींनी जे केले ते अत्यंत चूकच आहे, त्या बद्दल त्यांना माफ करताच येणार नाही. पण या मुलींचे वय आणि त्यांची पुढची करिअर, पुढील आयुष्य बघता हा व्हीडिओ viral करणे किती योग्य होते? त्यांचे चेहरे न दाखवता स्वतःच्या समाजसेवेचा डांगोरा पिटता आला नसता का? या प्रकारात मुलींचे फोटो दाखवणे हा गुन्हा आहे. या मुलींच्या पालकांना सांगून आणि या मुलींचे काउन्सल्लिंग करून योग्य मार्ग निवडता आला नसता का?’
‘मी या प्रकारानंतर पुण्याच्या कोथरूड पोलीस स्टेशन मधुन पत्रकार म्हणून माहिती घेतली, तेव्हा या मुली बिअर प्यायला होत्या आणि पोटात अन्न नसल्याने त्यांना नशा आल्याचे पोलिसानी सांगितले. या मुलींनी drugs घेतले नव्हते. पुन्हा सांगते मी मुलींना पाठीशी घालत नाही पण अशा प्रकारे व्हीडिओ viral करण्याला माझा आक्षेप आहे मी महिला आयोगाकडे एक महिला म्हणून तक्रार नोंदवली आहे,’ असे नेहा पुरव यांनी सांगितले.
पुणे: ‘मुळशी पॅटर्न’मधील पिट्या भाईंनी युवतींचा धक्कादायक Video आणला समोर…
जेनिफर अँड द बीस्ट पुस्तकाचे प्रकाशन! पोलिसांनी लेखनातून व्यक्त व्हावे: अशोक धिवरे
पुणे पोलिसांची ड्रग्जनंतर दारूवर मोठी कारवाई…
पुणे पोलिसांची ड्रग्जविरोधात मोठी कारवाई, कोट्यावधींचे ड्रग्ज जप्त…
Video: पुणे पोलिसांना 25 लाखांचे पारितोषिक : देवेंद्र फडणवीस
पुणे शहरातील हॉटेल आणि पबसाठी पोलिसांची नवी नियमावली…
Video: पुणे शहरात एम.डी. ड्रग्ज रॅकेटच्या आंतरराष्ट्रीय टोळीस अटक…
पुणे शहरात परदेशी व्यक्तीकडून ३० लाखांचे कोकेन जप्त: अनिता हिवरकर
पुणे शहरातील गुन्हेगारी संपवण्यासाठी पुणे पोलिसांचा पुढचा प्लॅन तयार…
पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…
Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…
Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

