जेनिफर अँड द बीस्ट पुस्तकाचे प्रकाशन! पोलिसांनी लेखनातून व्यक्त व्हावे: अशोक धिवरे

पुणे (संदिप कद्रे): सामान्यतः पोलिस हे अक्षरशत्रू असतात, ते कधीही आपल्या क्षेत्राच्या बाहेर जाऊन लेखन करत नाहीत असा समाज निर्माण झाला आहे. परंतु अशोक इंदलकर यांच्यासारख्या पोलिस अधिकाऱ्यांमुळे हा समाज खोटा ठरला असून, पोलिस हे चांगले समाजातील संवादक होऊ शकतात, त्यामुळे पोलिसांनी लेखनातून व्यक्त झाले पाहिजे आणि समाजाच्या व्यथा मांडल्या पाहिजेत, अशी भावना महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे माजी प्रमुख अशोक धिवरे यांनी व्यक्त केले.

ईश्वरी प्रकाशन तर्फे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अशोक इंदलकर लिखित जेनिफर अँड द बीस्ट या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन अशोक धिवरे यांच्या हस्ते मंगळवारी (ता. २७) झाले त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य वन्य विभागाचे माजी प्रधान सचिव सुनील लिमये, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, प्रकाशक संतोष धायबर यावेळी उपस्थित होते.

अशोक धिवरे म्हणाले, ‘जेनिफर अँड द बीस्ट या पुस्तकाची कथा केवळ जंगलापूर्ती मर्यादित नाही तर या पुस्तकाला वैश्विक अधिष्ठान आहे. ही कथा केवळ जंगलातील प्राण्यांची नाही तर धर्म, जात यांच्या पलीकडे जाऊन ही कथा माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी प्रवृत्त करते, त्यामुळेच ही कथा सर्वांनीच वाचली पाहिजे.’

श्रीपाल सबनीस म्हणाले, ‘मराठी भाषेतील पुस्तके इंग्रजीसह इतर भाषांमध्ये भाषांतरित केली तर खऱ्या अर्थाने मराठी भाषा ही वैश्विक रूप धारण करू शकेल. मराठी भाषेमध्ये अनेक दर्जेदार कलाकृती आहेत, परंतु आपण त्यांना केवळ एका विशिष्ट भाषेमध्ये किंवा प्रादेशिकतेमध्ये अडकवून ठेवतो त्यामुळे मराठी भाषेची श्रीमंती ठराविक माणसांपूर्तीच मर्यादित राहते. मराठी भाषेची श्रीमंती इतर भाषांमध्ये पोहोचण्यासाठी मराठी साहित्य क्षेत्रामध्ये भाषांतर मोठ्या प्रमाणावर होणे गरजेचे आहे.’

सुनील लिमये म्हणाले, ‘सरकारी अधिकारी यांना व्यक्त होण्यासाठी मर्यादा असतात, परंतु ते जर लेखनाच्या माध्यमातून व्यक्त झाले तर त्या कलाकृतीमध्ये जिवंतपणा असतो आणि अशा जिवंत कलाकृती समाजाला नेहमीच आवडतात. त्यामुळे अधिकाऱ्यांनी आपले अनुभव विविध माध्यमातून मांडणे गरजेचे आहे.’

अशोक इंदलकर म्हणाले, ‘पोलिस दलामध्ये नोकरी करण्यापूर्वी मी लेखक होतो आणि मी तो लेखनाचा छंद कायमच जपलेला आहे. पोलिस कमी लिहितात अशी अनेकदा तक्रार केली जाते परंतु त्यांनी लेखन केले तर ते अस्सल असते म्हणूनच ते समाजाला भावते. जुन्नर आणि राधानगरी या भागामध्ये पोलिस सेवेमध्ये काम करताना मला आलेले अनुभव मी या पुस्तकाच्या माध्यमातून गोष्टी स्वरूपात लोकांसमोर मांडले आहेत ते निश्चितच वाचकांना आवडतील.’

संतोष धायबर म्हणाले, ‘मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने ईश्वरी प्रकाशनाचे पहिलेच इंग्रजी पुस्तक प्रकाशित होत आहे, याचा विशेष आनंद आहे. या पुस्तकाचे कॅनडा आणि लंडन येथेही प्रकाशन करणार आहोत. पोलिस दलासाठी आम्ही मागील चार वर्षांपासून www.policekaka.com हे संकेतस्थळ चालवत आहोत. या संकेतस्थळाद्वारे पोलिस विभागातील घडामोडींना स्थान दिले जाते. विशेषत: पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विशेष स्थान दिले जाते. ‘पोलिसकाका’ ही पुस्तकांची मालिकाही आम्ही पुढे सुरू केली आहे. त्यासाठी आमची मोठी टीम कार्यरत आहे. पोलिस दलातील नोकरी ही प्रचंड ताणतणावाची असते. श्री. इंदलकर यांनी धडाकेबाज कारवाया करत असताना स्वत:तील लेखनाची आवड जोपासली आहे; ही कौतुकाची बाब आहे. श्री. इंदलकर यांच्याप्रमाणेच इतर पोलिस अधिकाऱ्यांनीही आपली नोकरी सांभाळून आपले अनुभव, आपला लेखनाचा छंद जोपासायला हवा. त्यांच्यासाठी पोलिसकाकासह ईश्वरी प्रकाशनाचे व्यासपीठही खुले आहे.’

‘मराठी साहित्याची आणि मराठी भाषेची व्याप्ती वाढविण्यासाठी मराठी साहित्य इंग्रजीसह इतर प्रादेशिक भाषेत अनुवादित होणं आवश्यक आहे. त्यासाठी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त अशोक इंदलकर सर यांनी एक कृतीशील पाऊल उचललं आहे,’ अशा शब्दांत कल्याणकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केले.

मुखपृष्ठकार राहुल बळवंत, अनुवादक सुरश्री जोशी, अशोक काकडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. पुस्तक प्रकाशनावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अश्विनी पळनीटकर यांनी सूत्रसंचालन केले. व्यंकटेश कल्याणकर यांनी प्रास्ताविक केले.

पोलिस अधिकारी अशोक इंदलकर यांच्या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन!

अशोक इंदलकर यांची अपर पोलिस अधिक्षकपदी नियुक्ती!

पोलिस अधिकारी अशोक इंदलकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन…

भैय्युजी महाराज आणि रांजणगावचा हल्ला: अशोक इंदलकर

आंतरराष्ट्रीय गुन्हेगार चार्लस शोभराज आणि पोलिस अधिकारी मधुकर झेंडे: अशोक इंदलकर

अशोक इंदलकरः लेखक आणि इतिहासाची आवड असणारा अधिकारी!

इतिहास पोलीस दल निर्मितीचा… (अशोक इंदलकर)

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!