पोलिसांनी रस्त्यावरच महिलेची अंत्ययात्रा थांबवली अन् पुढे…

यवतमाळ: विवाहित महिलेचा मृत्यू झाल्यानंतर महिलेच्या पतीसह तिच्या नातेवाईकांनी परस्पर अंत्यविधी उरकविण्याचा प्रयत्न केला. पण, डायल 112 वर तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी अंत्ययात्रा थांबवून तपास सुरू केला.

पोलिसांना तपासादरम्यान नवऱ्यानेच पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची माहिती पुढे आली. याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपाली मिश्रा (वय 28) असे मृत महिलेचे तर महेश जनार्दन मिश्रा (वय 34) असे आरोपी पतीचे नाव आहे. याबाबत रत्नकला शंकर तिवारी (वय 72, रा. वारज, ता. दारव्हा) यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्याला तक्रार दिली आहे.

घरगुती कारणातून वाद झाल्यानंतर पतीने पत्नी दिपालीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने इतर नातेवाईकांच्या मदतीने परस्पर अंत्यविधी उरकण्याचा प्रयत्न केला. दिपालीची अंत्ययात्रा जामनकरनगरातून स्मशानभूमीत जाण्यासाठी निघाली. याचवेळी डायल 112 वर संशयास्पद मृत्यूची तक्रार देण्यात आली. त्यानंतर अवधूतवाडी पोलीस जामनकरनगरच्या दिशेने रवाना झाले. पोलिसांना बाजोरियानगरात अंत्ययात्रा दिसताच थांबवून घरी परत घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. तसेच संशयित पतीला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली. मात्र तो हृदयविकाराच्या झटक्याने पत्नीचा मृत्यू झाल्याचे सांगत होता. रात्री उशीरा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर दिपालीचा गळा आवळून खून झाल्याचे समोर आले. तसेच याबाबत तक्रारही दाखल झाली.

दरम्यान, पोलिसांनी पती महेश यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास अवधूतवाडी पोलिस करत आहेत.

हृदयद्रावक! विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी नवरा-नवरीचा अपघाती मृत्यू…

पत्नीला शेतामध्ये प्रियकरासोबत पाहिल्यानंतर नवरा चिडला अन्…

महिलेसह दोन चिमुकल्यांचे आढळले मृतदेह; नवरा बेशुद्ध करायचा…

धक्कादायक! नवरा यूट्यूब पाहून करत होता पत्नीची घरीच प्रसूती अन् पुढे…

अहमदनगर हादरले! नवरा-बायकोच्या भांडणानंतर बापाने फेकले चिमुकल्यांना विहीरीत…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!