
शरद मोहोळ प्रकरणाशी संबंधित आरोपी ससून रुग्णालयातून पळाला…
पुणे : गँगस्टर शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकवणारा आरोपी ससून रुग्णालयातून पळाला आहे. पोलिसांना गुंगारा देत ससून हॉस्पिटल येथून पळ काढल्याने पुणे शहर पोलिस दलात खळबळ उडाली आहे. मार्शल लुईस लिलाकर असे आरोपीचे नाव असून त्याला सायबर गुन्ह्यात अटक केली होती. कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीला त्याने धमकी दिली होती.
सोशल माध्यमावरून रील्स आणि कमेंट करून शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांना धमकवल्या प्रकरणी पुणे पोलिसांनी दोन दिवसांपूर्वीच मार्शल लुईस लिलाकर याला लीलाकारला अटक केली होती. आज (रविवार) पहाटेच्या सुमारास लीलाकरने पोटात दुखत असल्याचा बाहाणा केला. त्यामुळे येरवडा जेलमधून त्याला ससून हॉस्पिटलमध्ये औषधोपचारासाठी आणण्यात आले होते. यावेळी मार्शल लुईस लीलाकर याने पोलिसांना गुंगारा देत पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. फरार असलेल्या लीलाकर याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी 8 पथके पाठवली असून, त्याचा पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
मार्शल लुईस लिलाकर पळून गेल्यानंतर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर मार्शल लुईसचा शोध पोलिस घेत आहेत. शरद मोहोळ याची हत्या झाल्यानंतर त्याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी न्यायालयात पुरवणी जबाबात आपल्याला धमकावले जात असून हत्येचे सूत्रधार मारणे आणि शेलार यांच्याकडून जीवाला धोका असल्याचं म्हटले होते.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी ड्रग्स माफिया ललित पाटील हा पोलिसांच्या हातावर गुंगारा देऊन पसार झाला होता. त्यानंतर ड्रग्सचं मोठं रॅकेट समोर आले होते. मात्र त्यानंतर आता शरद मोहोळ यांच्या पत्नी स्वाती मोहोळ यांना धमकावणारा आरोपी लीलाकर याने ससून रुग्णालयातून पळ काढल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी कुख्यात गुंड शरद मोहोळची पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मोहोळ हत्या प्रकरणी दोन वकिलांसह आतापर्यंत १७ जणांना अटक केली गेली. यात प्रमुख सूत्रधार गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार यांचाही समावेश आहे. त्यानंतर पत्नी स्वाती मोहोळला जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. या प्रकरणी स्वाती मोहोळने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार लीलाकर याला अटक केली होती. मात्र, आता त्याने पळ काढल्याने पुणे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
ससून ड्रग्ज प्रकरणात आणखी सात आरोपी निष्पन्न; ललित पाटील आणि सोने…
पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा लग्नाच्या वाढदिवशी हल्ल्यात मृत्यू…
गँगस्टर शरद मोहोळच्या पत्नीला पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या…
गँगस्टर शरद मोहोळ याच्या पत्नीचा जीवाला धोका असल्याचा दावा; कोणापासून पाहा…
थरार! शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले…
Video: शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडची पोलिसांनी काढली धिंड…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

