शरद मोहोळ हत्या प्रकरणात आणखी नवी माहिती समोर…

पुणे : शरद मोहोळ हत्या प्रकरणी पोलिसांनी हल्लेखोरांना शस्त्रे पुरवणाऱ्या दोघांना अटक केली असल्यामुळे अटक करण्यात आलेल्यांची संख्या दहा झाली आहे. आरोपींसोबत अटक केलेल्या वकिलांचे खूनापूर्वीच आरोपींशी बोलणे झाल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.

ऑक्टोबरमध्ये पहिल्या आठवड्यात हल्लेखोरांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. पण तो अपयशी ठरला होता. त्यावेळी आरोपींसोबत दोन्ही वकिलांची पिरंगुट येथे बैठक झाली होती. आरोपी कुठे भेटले, आणखी कुणी यात आहे का? मास्टरमाइंड कोण याच्या तपासासाठी आरोपींची पोलिस कोठडी वाढवून द्यावी अशी मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली होती. यानंतर न्यायालयाने दोन आरोपी वकिलांची ७ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

आरोपींसोबत झालेल्या बैठकीनंतर आरोपी वकिलांनी जुनी सिमकार्ड टाकून नवी सिमकार्ड घेतले. त्यावरून एकाला फोन केला. या गुन्ह्यात आणखी काही आरोपींची अटकेची शक्यता असल्याचंही पोलिसांनी म्हटले आहे. वकील वगळता इतर आरोपींना पोलिस कोठडी सुनावली असून त्यात ७ दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

शरद मोहोळवर ऑक्टोबरमध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. तो यशस्वी ठरला नव्हता. त्यावेळी गुन्ह्यातील आरोपींची दोन्हीही वकिलांसोबत बैठक झाली होती. खून होण्याआधी एका वकिलाचे आरोपींसोबत संभाषण झाल्याचेही तपासात समोर आले आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात दिली.

गँगस्टर शरद मोहोळ याचा CCTVसमोरच का केला खून…

मुळशी पॅटर्न! गँगस्टर शरद मोहोळ याच्या हत्येमागची INSIDE STORY…

शरद मोहोळची पत्नी कडाडली; नवरा वाघ होता तर मी वाघीण आहे…

कुख्यात गुंड शरद मोहोळ प्रकरण! पोलिसांनी आवळल्या आठही जणांच्या मुसक्या…

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा लग्नाच्या वाढदिवशी हल्ल्यात मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!