माजी नगरसेवकावर भरदिवसा गोळीबार…

गोंदिया: माजी नगरसेवक लोकेश उर्फ कल्लू यादव यांच्यावर आज (गुरुवार) भरदिवसा गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात लोकेश यादव हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे. हल्ल्यातील मारेकऱ्यांची ओळख पटली नसून मारेकऱ्यांचा शोध पोलीस घेत आहे.

लोकेश उर्फ कल्लू यादव हे माजी नगरसेवक असून ते अनेक सामाजिक कार्यात सक्रीय आहे. त्यांचे भाऊ पंकज यादव हे ठाकरे गटाचे शहर जिल्हाध्यक्ष आहेत. गोळीबाराच्या घटनेनंतर शहराच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लोकेश यादव यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरुवातीला त्यांना गोंदियातील कुंवर तिलक सिंग जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, यादव हे गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले.

गोळीबार करणारे मारेकरी नेमके कोण, हे अद्याप कळू शकले नाही. पोलिस अज्ञात मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. गेल्या काही काळात नागपूरसह विदर्भात अवैध बंदुकीचा वापर होताना आढळून आला आहे. शिवाय पोलिसांनी अनेकांच्या मुसक्यादेखील आवळल्या आहेत. ज्यामध्ये मोठ्याप्रमाणात अवैध शस्त्रांचे घबाड पोलिसांच्या हाती लागले आहे.

दरम्यान, पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची काही दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने पुण्यासह राज्यात एकच खळबळ उडाली. ही घटना ताजी असतानाच आज सकाळी तीन अनोळखी व्यक्तींनी गोंदिया शहराच्या यादव चौकाजवळ माजी नगरसेवक लोकेश यादव यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत.

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा लग्नाच्या वाढदिवशी हल्ल्यात मृत्यू…

पुणे शहरात थरार! सराफा व्यावसायिकावर गोळीबार अन् दागिने लुटले…

पुणे शहरात लहानपणापासूनच्या भांडणातून गोळीबार; एकाचा मृत्यू…

गँगस्टर शरद मोहोळ याचा CCTVसमोरच का केला खून…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!