
विमानतळ पोलिसांनी सापळा रचून पिस्टल बाळगणाऱ्यास केले जेरबंद…
पुणे (संदीप कद्रे): बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास विमानतळ पोलिसांनी जेरबंद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
विमानतळ पोलिस स्टेशनचे तपास पथकातील कर्मचारी पोहवा ७३० शैलेश नाईक व पोलिस नाईक २२९७ सचिन जाधव यांना त्यांचे बातमीदारा मार्फत ०३/०१/२०२४ रोजी रात्रौ २१/३० वा रोजी बातमी मिळाली की, खराडी बायपास बसस्टॉपचे शेजारी फुटपाथवर एक जण थाबलेला असून त्याच्याकडे पिस्तूल सारखे हत्यार आहे. सदरची बातमीचा आशय त्यांनी तपास पथकाचे प्रभारी सहा. पोलिस निरीक्षक विजय चंदन व इतर स्टाफ यांना कळविली. वरिष्ठांचे मार्गदर्शन व सुचनेनुसार विमानतळ पोलिस स्टेशनचे तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा रचून राकेश शंकर ठोकळ (वय २३ वर्ष रा. खजुरवस्ती दर्ग्याचे पाठीमागे वैदुवाडी, हडपसर, पुणे) यास पकडले. त्याचे जवळ एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत राऊंड मिळून आल्याने त्याचे विरुध्द विमानतळ पोलिस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमुद आरोपी याचेवर हडपसर पोलिस स्टेशन येथे यापुर्वी सहा गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलिस निरीक्षक विजय चंदन करीत आहेत.
सदरची कारवाई ही रंजनकुमार शर्मा अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, शशिकांत बोराटे, पोलिस उपायुक्त, परि ०४ पुणे शहर, श्री. संजय पाटील सहा. पोलिस आयुक्त, येरवडा विभाग पुणे शहर यांचे आदेशान्वये आनंदराव खोबरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विमानतळ पोलिस स्टेशन पुणे शहर व संगिता माळी पोलिस निरीक्षक (गुन्हे) विमानतळ पोलिस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि विजय चंदन, पोलिस अंमलदार रुपेश पिसाळ, शैलेश नाईक, सचिन जाधव, सचिन कदम, अंकुश जोगदंडे, रुपेश तोडेकर, योगेश थोपटे, दादासाहेब बर्डे, शंकर वाघुले, विशाल निलख, राकेश चांदेकर यांचे पथकाने केली आहे.
स्फोट! पुणे विमानतळाजवळ धडाधड फुटले 10 सिलेंडर…
विमानतळ पोलिस स्टेशन हद्दीमधील टोळीवर मोक्का; ७२वी कारवाई…
विमानतळ पोलिसांनी आंतरराज्यीय अट्टल वाहनचोरास केले गजाआड…
पुणे विमानतळावर वृद्ध महिलेने बॉम्ब अफवा पसरवून उडवली धावपळ…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

