
पुणे शहरात परराज्यातून येवून गुगलवर सर्च करून घरफोडी करणारा ताब्यात…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात परराज्यातून येवून गुगलवर उचभ्रू परिसर सर्च करुन घरफोडी करणा-या आरोपीच्या येरवडा तपास पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
येरवडा पोलिस स्टेशन हद्दीत ०६/१०/२०२३ ते दि. ०८/१०/२०२३ रोजीचे दरम्यान फिर्यादी सर्व कुटूंबियासोबत फॉर्म हाऊस येथे असताना अज्ञाताने फिर्यादी यांचे राहते घर कल्याणीनगर येथील बंगल्याचे खिडकीचे ग्रील उचकटुन आतमध्ये प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाट उचकटून कपाटामध्ये ठेवलेले ७,५४,०००/- रु किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने व २,५०,०००/- रोख रक्कम असा एकूण १०,०४,०००/-रु किंमतीचा मुद्देमाल घरफोडी करुन चोरुन नेला आहे. याबाबत येरवडा पो स्टे गु र नं ६८९/२०२३ भादवि ४५४,४५७,३८०,३४ अन्वये गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयाचा तपास करत असताना तपास पथकातील अधिकारी पोउपनि अंकुश डोंबाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोहवा अमजद शेख, पोअं अनिल शिंदे, प्रशांत कांबळे, सुरज ओबासे, सागर जगदाळे यांनी कल्याणीनगर, पुणे रेल्वे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, नानापेठ या ठिकाणचे सुमारे ३०० चे आसपास सीसीटीव्ही कॅमे-यांचे फुटेज चेक करुन आरोपी निष्पन्न केले. तसेच तपासा दरम्यान चतुश्रृंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये भोसले नगर येथे दोन ठिकाणी देखील घरफोडी झाली होती. सदर ठिकाणचे उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता कल्याणी नगर येथील व भोसले नगर येथील आरोपी एकच असलेचे दिसून आले. किरण घुटे यांनी तांत्रिक विश्लेषण करुन दाखल गुन्हयातील आरोपी हे तेलंगणा येथील असल्याचे निष्पन्न झालेने वरिष्ठ पोलिस निरीक्षक येरवडा पोलिस स्टेशन यांनी मार्गदर्शन केले त्याप्रमाणे येरवडा व चतुश्रृंगी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तेलंगणा येथे जावून संशयीतास पळून जात असताना अतिशय शिताफीने पकडले.
नरेंद्र बाबु नुनसावत (वय २७ वर्षे रा आरटीसी कॉलनी कमान टीकेआर कॉलेज इंदिरानगर मीरपेठ हैद्राबाद तेलंगणा) असे आरोपीचे नाव आहे. सदर गुन्हयाचे अनुषंगाने त्याच्याकडे अधिक तपास करता त्याने सदरचा गुन्हा त्याचे इतर साथीदार सतिश बाबू करी (रा. हैद्राबाद तेलंगणा) व गुरुनायक केतावत (रा. हैद्राबाद तेलंगणा) यांचे साथीने केल्याचे कबूल केले आहे. मोठ्या शहरामध्ये जाऊन इंटरनेट वरुन रिच एरिया सर्च असे करुन, त्यावरुन प्राप्त माहीतीचे अधारे सदर परिसरामध्ये रेखी करुन, रात्रीचे वेळी घरफोडी करीत असले बाबत सांगीतले आहे. अटक आरोपी नरेंद्र नुनसावत याचेवर यापुर्वी तेलंगणा, हैद्राबाद, तिरुपती, चेन्नई या ठिकाणी घरफोडी चे गुन्हे दाखल असून त्यामध्ये त्यास अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीस १२/१२/२०२३ रोजी गुन्हयात अटक करण्यात आली असुन, आरोपीकडून सोन्याचांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. सदर आरोपीकडे आणखी तपास करता त्यांनी अशाच प्रकारे भोसले नगर पुणे येथे गुन्हे केल्याचे कबूल केले आहे. त्यानुसार चतुश्रृंगी पोलिस स्टेशनच्या अभिलेखावर पडताळणी केली असता चतुश्रृगी पो स्टे गु र नं ८७२/२०२३ भादवि ४५४,४५७,३८०,३४ व गु र नं ८७५/२०२३ भादवि ४५४,४५७,३८०,३४ अन्वये गुन्हे दाखल असून सदरचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि अंकुश डोंबाळे करत आहेत. सदर आरोपीकडून खालील गुन्हे उघडकीस आणले आहेत.
१. येरवडा पो स्टे गु र नं ६८९/२०२३ भादवि ४५४,४५७,३८०,३४
२. चतुश्रृगी पो स्टे गु र नं ८७२/२०२३ भादवि ४५४,४५७,३८०,३४
३. चतुश्रृगी पो स्टे गुर नं ८७५/२०२३ भादवि ४५४,४५७,३८०,३४
सदरची कामगिरी रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, शशिकांत बोराटे, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ-४, संजय पाटील सहा. पोलिस आयुक्त, येरवडा विभाग, बाळकृष्ण कदम, वपोनि येरवडा, कांचन जाधव, पोनि गुन्हे, जयदिप गायकवाड, पोनि गुन्हे येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोउपनि अंकुश डोंबाळे, श्रेणी पोउपनि प्रदिप सुर्वे, पोहवा गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, अमजद शेख, कैलास डुकरे, पोना सागर जगदाळे, पोअं अनिल शिंदे, राहुल परदेशी, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले तसेच चतुश्रृंगी पोलिस स्टेशन तपास पथकाचे अधिकारी सपोनि नरेंद्र पाटील, पोहवा श्रीकांत वाघोले, इरफान मोमीन, पोना ज्ञानेश्वर मुळे, पोअं प्रदिप खरात यांनी केली आहे.

येरवडा तपास पथकाने चोरी करणाऱ्यास २४ तासात केले जेरबंद…
येरवडा तपास पथकाने सराईत आरोपींना केले जेरबंद…
येरवडा कारागृहात आढळले मोबाईल; कसे पोहचतात पाहा…
येरवडा हद्दीत गुन्हे करणाऱया टोळीवार मोक्का अंतर्गत कारवाई; पाहा नावे…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे ३६० दिवसात मोक्काचे शतक!
पुणे शहरात वरिष्ठ व्यवस्थापक महिलेला म्हणाला, फक्त एक ‘किस’ दे अन् पुढे…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

