पुणे शहरात वरिष्ठ व्यवस्थापक महिलेला म्हणाला, फक्त एक ‘किस’ दे अन् पुढे…

पुणे: एका 70 वर्षाच्या अधिकाऱ्याने फक्त एक ‘किस’ दे म्हणत महात्मा फुले संग्रहालयात अधिकारी महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजीव विनायक विळेकर असे या व्यक्तीचे नाव असून, याप्रकरणी डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

पुण्यातील घोले रस्त्यावरील महात्मा फुले वस्तू संग्रहालयातील सहकारी महिलेचा या वृद्ध व्यक्तीकडून विनयभंग करण्यात आला. ऑफिसमध्ये काम करत असतानाच सहकारी महिलेकडे 70 वर्षीय वरिष्ठ व्यवस्थापकाने चुंबनाची मागणी केली. त्यानंतर ही महिला नकार देत असताना आरोपीने महिलेला जबरदस्तीने जवळ घेत चुंबन घेतले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

फक्त एक ”किस” दे म्हणत महात्मा फुले संग्रहालयात अधिकारी महिलेचा विनयभंग केला. महात्मा फुले वस्तु संग्रहालयामध्ये काम करणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याकडे ”कीस” मागत तिचा विनयभंग करण्यात आला. संबंधित घटना 13 डिसेंबर रोजी दुपारी पावणेबाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी भादवि 354 अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी 39 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

पीडित महिला महात्मा फुले संग्रहालयात अधिकारी आहे. आरोपी हा वरिष्ठ व्यवस्थापक आहे. विळेकर हे या महिलेच्या टेबलजवळ गेले. त्यांना जवळ ओढून त्यांना ‘एक किस दे” असे म्हणाला. महिलेने त्याला असे करण्यास नकार दिला. त्यानंतर त्याने ‘तुला प्रॉब्लेम असेल तर आपण दरवाजा लावून घेऊ’ असे म्हणत बळजबरीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला होता.’ दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

पुणे हादरले! अल्पवयीन मुलीचा घरात घुसून विनयभंग अन् आत्महत्या…

पतीच्या बॉसने केला महिलेचा विनयभंग अन्…

पुणे शहरातील महिलेच्या पतीचे कोरोनात निधन, अल्पवयीन युवकासोबत शरीरसंबंध अन्…

लष्करातून निवृत्त झालेल्या वृद्धाला अश्लिल व्हिडिओ कॉल अन्…

पुणे शहरातील आजोबा कॉल गर्लला भेटले अन् पुढे…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!