
लक्ष्मीकांत बेर्डे यांचे बंधू अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन…
मुंबई : आपल्या अनोख्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते रविंद्र बेर्डे (वय ७८) यांचे आज (बुधवार) निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांना घशाच्या कर्करोगाचे निदान झाले होते. त्यांच्यावर मुंबईत टाटा रुग्णालयात उपचार सुरू होते.
रवींद्र बेर्डे हे अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे भाऊ होते. रवींद्र बेर्डे यांच्यावर उपचार सुरू असतानाच श्वास घेण्यासाठीही त्रास होत होता. दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. मात्र, अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
रवींद्र बेर्डे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतही अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. चंगू मंगू, धमाल बाबल्या गणप्याची, एक गाडी बाकी अनाडी, खतरनाक, होऊन जाऊदे, हमाल दे धमा, थरथराट, धडाकेबाज, गंमत जंमत, झपाटलेल्या या गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला होता.
रवींद्र बेर्डे यांनी १९६५ मध्ये नाट्यसृष्टीत पाऊल टाकले. तर चित्रपटसृष्टीत ३०० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये आणि ५ हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. १९९५ मध्ये व्यक्ती आणि वल्ली नाटकावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. गेल्या दहा ते १२ वर्षांपासून त्यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती.
ज्येष्ठ अभिनेते ज्युनिअर मेहमूद यांचे निधन; शेवटची इच्छा…
अभिनेत्रीचा आढळला मृतदेह; प्रेमसंबंधातून आत्महत्या…
हृदयद्रावक! गरोदर अभिनेत्रीने बाळाला न पाहताच घेतला जगाचा निरोप…
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन…
अभिनेत्री अंकिता लोखंडे हिला पितृशोक…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

