संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल; कारण…

यवतमाळ : शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मध्ये एक लेख प्रसिद्ध झाला आहे. या प्रकरणी भाजप नेत्याने यवतमाळमध्ये राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लेखाच्या माध्यमातून वेगवेगळ्या गटांमध्ये द्वेष वाढवण्यासाठी चिथावणी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी उमरखेड पोलिस ठाण्यात संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवतमाळमधील भाजपचे संयोजक नितिन भुटाडा यांनी पोलिस ठाण्यात विनंती पत्र दिलं आहे. त्यांनी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, नितिन भुटाडा यांनी दावा केला की, संजय राऊत यांनी ११ डिसेंबरला ‘सामना’त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह लेख लिहीला आहे.’

लेखामध्ये म्हटले आहे की..
तेलंगणा विधानसभेच्या प्रोटेम स्पीकरपदी ज्युनिअर ओवेसी यांची नियुक्ती झाल्यावरून ११ डिसेंबरच्या सामनाच्या संपादकीय अग्रलेखात भाजपावर टीका करण्यात आली. ही नियुक्ती तेलंगणाचे राज्यपाल टी. सुंदरराजन यांच्या आदेशाने झाल्याने भाजप ढोंगी असल्याची टीका करण्यात आली आहे. भाजपच्या ढोंगांना व नेत्यांना जनता कंटाळलीय. विशिष्ट धर्माची मते काँग्रेसकडं जाऊ नयेत, यासाठी भाजपने ओवेसी योजना अमलात आणूनही काँग्रेसचा तेलंगणात विजय झाला. तेलंगणात भाजपच्या ८ आमदारांनी शपथ घेणार नाही, असे ढोंग रचले.

तेलंगणात मोदी-शाह – नियमानुसार सभागृहात सर्वात ज्येष्ठ सदस्याची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती करण्यात येते. नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्यापूर्वी अकबरुद्दीन ओवेसी हे तात्पुरते विधानसभा अध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, भाजपाकडून ओवेसी यांच्याकडून शपथ घेणे म्हणजे हिंदुत्वास बाधा आणणे असे म्हटले जात आहे. भाजपने हिंदुत्वाचा बुरखा घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या नाटकानं बुरखा पाडला. तेलंगणात मोदी-शाह यांच्या भाजपाची धुळधाण उडाल्याचे लेखात म्हटले आहे.

मुंबई पोलिसांच्या बनावट वेबसाईटप्रकरणी गुन्हा दाखल; बनावट वेबसाइट कशी ओळखाल…

सातारा येथे दोन डीजे व्यवसायिकांमध्ये खुन्नस; गुन्हा दाखल…

विवस्त्र महिला धावतानाचा व्हिडिओ व्हायरल; भाजप आमदार पत्नीविरोधात गुन्हा दाखल…

Video: शौचालय साफ करायला लावल्याप्रकरणी खासदारावर गुन्हा दाखल…

मिलिंद एकबोटे यांच्यासह 3 जणांवर गुन्हा दाखल…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!