
दिशा सालियान प्रकरण! आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता…
मुंबईः दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियान प्रकरणी राज्य सरकार शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची एसआयटीची चौकशी करणार आहे. तसेच, एसआयटीसंदर्भात आजच ऑर्डर येण्याची शक्यता आहे. सुजाता सौनिक आज एसआयटी संदर्भात ऑर्डर काढू शकतात, अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, अतिरिक्त पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वात एसआयटी पथक काम करणार आहे.
दिशा सालियान प्रकरणामध्ये सध्या सत्तेत असलेले एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीचे सरकार विशेष तुकडी (एसआयटी) स्थापन करुन चौकशी करणार आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एसआयटी काम करणार आहे. यामुळे दिशा सालियान आत्महत्या प्रकरणामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दिशा सालियान प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्याची मागणी मागील काही काळापासून सातत्याने काही आमदारांकडून केली जात होती. याच मागणीची दखल घेत मागच्या वर्षी हिवाळी अधिवेशनामध्ये राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते. आता लवकरच ही चौकशी केली जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान, दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणाशी आदित्य ठाकरेंचा संबंध असल्याचा आरोप अनेकदा भाजपाच्या आमदारांकडून करण्यात आला. दिशाचा मृत्यू झाला त्यावेळी आदित्य ठाकरे नेमके कुठे होते? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच त्यांचे आमदार पुत्र नितेश राणे यांनी अनेकदा आदित्य ठाकरे यांचा थेट उल्लेख करत दिशा सालियान प्रकरणाशी त्यांचा संबंध असल्याचा दावा केला होता. आता याच प्रकरणात आदित्य ठाकरे यांची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी केली जाणार असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होईल अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.
दिशा सालियान हिचा 8 जून 2020 रोजी मालाड येथील निवासी इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. मुंबई पोलिसांनी या प्रकरणीही अपघाती मृत्यूची नोंद केली होती. दिशा हिची हत्या झाली असून आदित्य यांचा या हत्येशी संबंध असल्याचा आरोप भाजप नेते नारायण राणे यांनी केला होता. त्यांनीही या प्रकरणी चौकशीची मागणी केली होती.
दिशा भोईटे हिचा वैद्यकीय खून समजावा का?
दिशा भोईटे हिच्या मृत्यूबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन; चौकशीची मागणी…
Video: ‘जेलर’ फेम अभिनेता विनायकनला अटक; कारण…
अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू; बलात्कार झाल्याचा आईचा आरोप…
Live Video: अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारला इटलीमध्ये अपघात; दोघांचा मृत्यू…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

