
पुणे पोलिसांनी फिल्मी स्टाईलने केला पर्दाफाश; 10 हजार किमी पाठलाग अन् रोकड, सोने जप्त…
पुणे : मुंबईत पोहोचवण्यासाठी मालकाने दिलेली 28 लाख रुपयांची रोकड आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांची बॅग घेऊन पळालेल्या कुरिअर बॉयचा पुणे पोलिसांनी फिल्मी स्टाईल पर्दाफाश केला आहे. पुण्यातील खडक पोलिसांनी तब्बल 25 दिवस आणि 10,000 किलोमीटरचा थरारक प्रवास करत उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधून मुख्य आरोपीसह चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
तक्रारदार जितेन्द्र ऋषिकेश सिंह यांच्याकडे विशाल सत्यपाल चौहान (वय 20, रा. मिसा कलान, जि. एटा, उत्तर प्रदेश) हा तरुण कुरिअर बॉय म्हणून कामाला होता. सोन्याचे दागिने तयार करण्यासाठी लागणारे सोने, सोन्याची बिस्किटे आणि मजुरीची रोकड मुंबईतील कार्यालयात सुरक्षित पोहोचवण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. नियमितप्रमाणे विशाल 28 लाख रुपयांची रोकड आणि दागिने असलेली बॅग घेऊन निघाला. मात्र, मुंबईला जाण्याऐवजी त्याने वाटेतूनच पळ काढला. मालकाच्या विश्वासाला तडा देऊन कामगारच लाखोंचा ऐवज घेऊन पसार झाल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
View this post on Instagram
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणातून आरोपी विशाल हा उत्तर प्रदेशातील आपल्या मूळ गावी आणि नातेवाईकांकडे लपून बसल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या शोधासाठी सहायक पोलिस निरीक्षक प्रसन्न जहागड आणि त्यांच्या विशेष पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. उत्तर प्रदेशातील एटा, कासगंज, गौतमबुद्धनगर तसेच उत्तराखंडमधील देहरादून येथे तब्बल 10,000 किमीचा प्रवास करत सलग तीन वेळा शोधमोहीम राबवली. सलग 25 दिवसांच्या प्रयत्नांनंतर पोलिसांनी मुख्य आरोपी विशाल चौहानसह त्याचे साथीदार विकासकुमार जाधोन आणि ब्रिजेश सुरेंदरसिंग चौहान व इतर एकास अटक केली.
पोलिसांनी आरोपींच्या घरांची झडती घेतली असता चोरीचा मोठा ऐवज जप्त करण्यात आला. विकासकुमार जाधोन याच्या घरातून 16 लाख 80 हजार रुपये किमतीची 120 ग्रॅम वजनाची सोन्याची दोन बिस्किटे हस्तगत करण्यात आली, तर ब्रिजेश चौहान याच्या घरातून 7 लाख रुपयांची रोकड, सोन्याची अंगठी आणि चांदीची साखळी जप्त केली. या कारवाईत पोलिसांनी एकूण 26 लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून उर्वरित रकमेचा शोध सुरू आहे. विशालच्या भावावर सुमारे 15 लाख रुपयांचे कर्ज होते आणि ते फेडण्यासाठीच त्याने हा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे शहरात काम करत असलेल्या एअर हॉस्टेसची गोंदियाजवळ हत्या…
सांगली! पुण्यातून दिवाळीनिमित्त गावी गेलेल्या विवाहित प्रेयसीची हत्या…
पुणे पोलिस दलातील हवालदाराचा बंदोबस्तादरम्यान हृदयविकाराने मृत्यू…
पुणे शहरात ऐन दिवाळीत रक्तरंजित थरार! ‘लाल्या’ला जागीच संपवलं…
‘पोलिसकाका’च्या बातमीचा परिणाम! पुणे पोलीस आयुक्तालयात दिवाळी गिफ्ट आणण्यास बंदी…

