सांगलीमध्ये लग्न मोडल्याचा राग अन् सपासप वार करत केली हत्या…

सांगली: ईश्वरपूर शहरातील कामेरी नाका परिसरात जुन्या वादाचा राग मनात धरून दोघांनी केलेल्या हल्ल्यात सुरज कांबळे या युवकाचा मृत्यू झाला आहे. अचानक धारदार हत्यारांचे सपासप वार आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाच्या दृश्याने परिसरात खळबळ उडाली.पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

सुरज महादेव कांबळे (वय 31, रा. आंबेडकरनगर, ईश्वरपूर, ता. वाळवा) असे मृत युवकाचे नाव आहे. रविवारी (दि. 1 नोव्हेंबर) रात्री साडेअकराच्या सुमारास कामेरी नाका परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी साहिल अनिल कांबळे (वय 27) आणि अंकित मुकुंद कांबळे (वय 30, दोघेही रा. आंबेडकरनगर, ईश्वरपूर) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांपैकी अंकित हा दिवंगत माजी उपनगराध्यक्ष मुकुंद कांबळे यांचा मुलगा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज आणि संशयित आरोपी यांच्यात यापूर्वीपासूनच वाद होता. लग्न मोडल्याच्या कारणावरून त्यांच्यात वैमनस्य निर्माण झाले होते. रविवारी रात्री एका कपड्याच्या दुकानात किरकोळ कारणावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला होता. रात्री साडेअकराच्या सुमारास सुरज कामेरी नाका येथील बालाजी प्लायवुड अँड हार्डवेअर दुकानासमोर आला होता. यावेळी पूर्वीच्या वादाचा राग मनात धरून साहिल आणि अंकित यांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला. कोयता आणि चॉपरसारख्या धारदार हत्यारांनी डोक्यात व छातीवर सपासप वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेला सुरज रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. या हल्ल्यात उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. पहाटे चारच्या सुमारास सुरजचा चुलत भाऊ आप्पासाहेब सिद्धनाथ कांबळे यांनी ईश्वरपूर पोलिसांत फिर्याद दिली. हल्ल्यानंतर दोन्ही संशयित पसार झाले असून, त्यांच्या शोध पोलिस पथके घेत आहेत.

पुणे! ‘किंग इज बॅक’ असं स्टेट्स ठेवलं अन् सपासप वार…

पुणे जिल्ह्यात युवकाची सपासप वार करून निर्घृण हत्या; थरार CCTV कॅमेऱ्यात कैद…

प्रेमाचा त्रिकोण! पुण्यात प्रियकराची सपासप वार करत निर्घुण हत्या…

नाशिकमध्ये युवतीची भररस्त्यात सपासप वार करत हत्या…

पुणे! गुंड निलेश घायवळ टोळीतील टोळक्याने केले युवकावर सपासप वार…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!