
मुग्धा लंडनमध्येच असल्याचे भासवत होती; पुण्यात आढळला मृतदेह…
पुणे: मुग्धा अविनाश देशमुख (वय 34) हिचा पुण्यातील एका बंद फ्लॅटमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. एमबीएच्या शिक्षणासाठी लंडनला गेलेली मुग्धा दोन महिन्यांपूर्वी कुटुंबीयांना कोणतीही कल्पना न देता भारतात परतली होती. तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.
मुग्धा बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी उस्मानपुरा पोलिसांकडे धाव घेतली होती. अपहरणाच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सायबर ट्रॅकिंगची मदत घेतली. या तपासातून पिंपरी-चिंचवडजवळील शिरगाव येथील एका बंद फ्लॅटचा ठावठिकाणा लागला. 28 ऑक्टोबरच्या रात्री पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा उघडला असता, आत मुग्धाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.
मुग्धा जुलै 2025 मध्ये एमबीएच्या शिक्षणासाठी लंडनला गेली होती. तिथे असताना ती दररोज आई-वडिलांच्या संपर्कात होती. मात्र, 23 ऑक्टोबर 2026 रोजी तिने आईला फोन करून मुलाखतीसाठी जात असल्याचे सांगितले. त्यानंतर 24 ऑक्टोबरच्या रात्री साडेआठ वाजल्यापासून तिचा मोबाइल बंद येऊ लागला. मुग्धाशी संपर्क होत नसल्याने कुटुंबीय काळजीत पडले. त्यांनी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात धाव घेतली. यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला.
View this post on Instagram
मुग्धाचा मोबाइल बंद असल्याने तिचा ठावठिकाणा शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. अखेर सायबर ट्रॅकिंगच्या मदतीने पोलिसांनी तपास पुढे नेला. 28 ऑक्टोबरच्या रात्री उपनिरीक्षक किरण बोराडे आणि अंमलदार विलास कराळे यांच्या पथकाने शिरगाव पोलिसांच्या मदतीने शिरगाव येथील संबंधित फ्लॅट गाठला. फ्लॅट बंद असल्याने दरवाजा तोडून आत प्रवेश करण्यात आला. त्यावेळी मुग्धाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेहाशेजारी औषधांच्या गोळ्याही विखुरलेल्या होत्या.
पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, मुग्धाचा मृत्यू 24 ऑक्टोबर रोजीच झाला असावा. फ्लॅटमधील एसी आणि पंखा सुरू असल्याने मृतदेहाची दुर्गंधी बाहेर पसरली नसावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मुग्धाच्या मृतदेहाशेजारी औषधांच्या गोळ्या आढळल्या असल्या, तरी तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. व्हिसेरा तपासणी आणि अंतिम शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी शिरगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुग्धाने लंडनमध्ये असतानाच 15 एप्रिल 2026 रोजी शिरगाव येथील हा फ्लॅट भाड्याने घेतला होता. लंडन पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तिने ऑगस्टच्या अखेरीस ब्रिटन सोडले होते. त्यानंतर 1 सप्टेंबरपासून ती पुण्यातील याच फ्लॅटमध्ये राहत होती. मात्र, ती भारतात परतल्याचे कुटुंबीयांना समजू न देता लंडनमध्येच असल्याचे भासवत होती. पोलिस तपास आणि वैद्यकीय अहवालानंतरच या प्रकरणातील गूढ उकलण्याची शक्यता आहे.
नवविवाहित युवक आणि युवतीच्या पायाला साखळी अन् कुलुप; नदीत दोघांचे मृतदेह…
शेतकऱ्याला फायनान्सवाले घेऊन गेले अन् मृतदेहच हाती; कुटुंबाचा गंभीर आरोप…
पुण्यात तलावात सापडलेल्या मृतदेहाबाबत खुलासा; दिल्लीतून अटक…
प्रियकरासोबत फिरायला गेली, परंतु मृतदेह घरी आला…

