नाशिकच्या दीपाली पवार मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट…

नाशिक : प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यसेविका म्हणून काम करणाऱ्या दीपाली पवार यांच्या मृत्यू प्रकरणात पती अनिल सोन्याबापू पवार याच्या पोलिस कोठडीत ११ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. शुक्रवारी न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान दीपालीच्या मोबाईलचा कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) काढल्याची बाब समोर आल्याने या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. हा सीडीआर कोणाच्या आदेशावरुन काढण्यात आला, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला आहे.

पोलिस पतीच्या छळाला कंटाळून दीपाली अनिल पवार (वय ३७, महात्मा नगर, नाशिक) यांनी विषारी औषध प्राशन केले होते. उपचारादरम्यान मृत्यू झाला. दीपालीच्या वडिलांनी सातपूर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, पती तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शारीरिक व मानसिक छळ करत असल्याचा दावा केला आहे. शिवाय, अहिल्यानगर येथील तिच्या नावावरील फ्लॅट भावाच्या नावावर करण्यासाठी दबाव टाकल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर संशयित अनिल पवार याला अटक करण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

सुनावणीदरम्यान दीपालीच्या कुटुंबीयांच्या वतीने वकीलांनी युक्तिवाद केला. “मोबाईल सीडीआरच्या मुद्द्यामुळे पती चारित्र्यावर संशय घेत असल्याच्या आरोपांना बळ मिळाले आहे. कोठडीच्या कालावधीत आणखी पुरावे एकत्र करुन संशयिताला कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दीपालीच्या मुलाने चित्रित केलेला आणि छळाचा दावा असलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, परंतु त्याची सत्यता पडताळणे बाकी आहे. पोलिसांसमोर आता सर्व पुरावे तपासून तपास करण्याचे आव्हान आहे.

दरम्यान, दीपाली पवार यांचा विवाह अनिल पवार याच्याशी सन २०१४ मध्ये झाला होता. दीपाली या जातेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून काम करत होत्या, तर तिचा पती अनिल पवार हा नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ लिपीक म्हणून कार्यरत आहे. दीपालीच्या चारित्र्यावर संशय घेत पती तिला मारहाण करत असल्याचा आरोप आहे. याच जाचाला कंटाळून दीपालीने ५ ऑक्टोबर रोजी विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर दीपालीला चक्कर आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला. तिने गंगापूर रोड येथील एक खाजगी रुग्णालय गाठले. तिथून तिला नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले. दीपालीचा भाऊ भूषण गायकवाड यांनी पुन्हा एका खाजगी रुग्णालयात हलवले, मात्र उपचार सुरू असताना दीपालीने अखेरचा श्वास घेतला.

नाशिकमध्ये पोलिसाच्या पत्नीनं संपवलं जीवन; कारण आलं पुढं…

नाशिक! प्राध्यापिकेचे अश्लील व्हिडिओ विद्यार्थ्याने केले स्क्रीन रेकॉर्ड अन्…

नाशिक! डॉ. मनीषा जेजूरकर प्रकरणात नवा ट्विस्ट; दाजीचं वागणं खूप बदललं…

नाशिक! प्रेमात मला फसवले, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्…

नाशिक! विवाहितेच्या मृत्यू प्रकरणाला वळण, रिसॉर्टवर प्रियकराने घेतला जीव…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!