कोल्हापूरमध्ये प्रेमाचा भयानक शेवट; तू माझी नाही तर कोणाचीच नाही…

कोल्हापूर: प्रेयसीचा विवाह दुसऱ्याशी ठरल्याच्या संतापातून एकाने अपहरण करून तिला थेट दरीत ढकलून दिल्याची संतापजनक घटना भुदरगड तालुक्यातील शिवडाव नाईकवाडी परिसरात घडली आहे. यामध्ये युवतीचा जागीच मृत्यू झाला आहे. तरुणी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी श्रीपाद वडर याला अटक केली आहे.

मृत युवती आणि संशयित आरोपी श्रीपाद वडर यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, काही दिवसांपूर्वी युवतीचे लग्न तिच्या घरच्यांनी ठरवले होते. याच रागातून त्याने तिच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. श्रीपादने युवतीचे अपहरण केले. त्यानंतर तिला भुदरगड तालुक्यातील शिवडाव नाईकवाडी परिसरातील एका निर्जन भागात नेले. तिथे दोघांमध्ये वाद झाल्यानंतर आरोपीने तिला खोल दरीत ढकलून दिले. खोल दरीत कोसळल्यामुळे युवतीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागेवर मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

घटनेची माहिती मिळताच भुदरगड पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी कसून चौकशी सुरू केली असता, संशयित प्रियकर श्रीपाद वडर याने चौकशी दरम्यान गुन्ह्याची कबुली दिली आहे. भुदरगड पोलिसांनी आरोपी श्रीपाद वडर याला तात्काळ अटक केली असून, त्याच्यावर हत्येचा व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

कोल्हापूर! प्रियकराने लॉजवर पत्नीसारखीच केली प्रेयसीची क्रूरपणे हत्या..

कोल्हापूर! प्रियकराने केलेल्या माजी सरपंचबाईंच्या हत्येत आला नवा ट्विस्ट…

कोल्हापूर! प्रेमी युगुलाची घनदाट जंगलात गळफास लावून आत्महत्या…

कोल्हापूर! नवऱ्याने मध्यरात्री आवळला पत्नीचा गळा; पैसे कोणाला देतेस…

नवऱ्याला दीड लाख पगार अन् प्रियकरासोबत पत्नीला रंगेहाथ पकडले…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!