
पुणे MPSC आंदोलनाबाबत दुसरा गुन्हा दाखल; पाहा नावे…
पुणे: MPSC आंदोलनासंदर्भात विश्रामबाग पोलिस ठाण्यात आता दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान विनापरवाना ड्रोन उडवल्याप्रकरणी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्यासह प्रमोद पाटील, दिगंबर खाडे, ऋषिकेश गांगुर्डे आणि अक्षय कांबळे यांच्याविरुद्ध ही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान ड्रोनद्वारे चित्रीकरण (शूटिंग) करण्यात आले होते. मात्र, हे ड्रोन उडवण्यासाठी किंवा शूटिंग करण्यासाठी पुणे पोलिसांची कोणतीही कायदेशीर परवानगी घेण्यात आली नव्हती. नियमांचे उल्लंघन करून विनापरवाना ड्रोनचा वापर केल्याप्रकरणी पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत विश्रामबाग पोलिस ठाण्यात हा नवीन गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.
View this post on Instagram
रोहित पवार सोडून इतर 15 जणांवर गुन्हे दाखल…
प्रमोद पाटील
अक्षय कांबळे
अनिकेत देशमाने
प्रवीण महादेव पाटील
ऋषिकेश गांगुर्डे
प्रियंका चौधरी
नितीन गिते
सोमनाथ चव्हाण
ओंकार पाटील
गजानन शेळके
अजित काकडे
सिद्धार्थ पंचांगे
संकेत कणसे
सिद्धार्थ जांभूळकर
साहेबराव क्षीरसागर
दरम्यान, या प्रकरणात प्रमोद पाटील, अक्षय कांबळे, अनिकेत देशमाने, प्रवीण महादेव पाटील, ऋषिकेश गांगुर्डे, प्रियंका चौधरी, नितीन गिते, सोमनाथ चव्हाण, ओंकार पाटील, गजानन शेळके, अजित काकडे, सिद्धार्थ पंचांगे, संकेत कणसे, सिद्धार्थ जांभूळकर आणि साहेबराव क्षीरसागर या 15 जणांची नावे फिर्यादीत नमूद आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या आंदोलनामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली आणि सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली. पुणे शहरात 29 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू असताना तसेच शास्त्री रोड आणि परिसरात आंदोलन, सभा, मोर्चे व रास्ता रोको करण्यास निर्बंध असताना आंदोलन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 189(2), 189(3), 189(5), 126(2), 223, 270 आणि 292, तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियमातील कलम 37(1), 37(3), 135, 112 आणि 117 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विश्रामबाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) विकास भिंगारदिवे करीत आहेत.
एमपीएससी आंदोलनात उपोषण सोडताच पुणे पोलिसांकडून 15 जणांविरोधात गुन्हा दाखल; पाहा नावे…
पुणे! पोलिस अधिकाऱ्याची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या…
पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन लंडनला पळालेल्या निलेश घायवळ याला क्लिन चीट…
पुणे पोलिस ॲक्शन मोडमध्ये, डीजे वाजवणाऱ्या मंडळांना धडाधड पाठवल्या नोटीसा…
पुणे पोलिस दलातील हवालदाराचा बंदोबस्तादरम्यान हृदयविकाराने मृत्यू…
पुणे शहरातील 11 पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल; पाहा नावे…

