
पुणे! पोलिस अधिकाऱ्याची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या…
पुणे (संदिप कद्रे): पोलिस उपनिरीक्षक (PSI) निलेश भाऊसाहेब पाटील यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (बुधवार) दुपारी तीनच्या सुमारास औंध परिसरात घडली आहे. या घटनेनंतर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
निलेश भाऊसाहेब पाटील (वय ५५) हे पुणे शहर पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षक (PSI) म्हणून कार्यरत होते आणि सध्या त्यांची नेमणूक विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात होती. आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास त्यांनी स्वतःजवळील रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडली. गोळीचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
View this post on Instagram
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिस ताफा तातडीने घटनास्थळी दाखल झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पाटील यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
दरम्यान, निलेश पाटील यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, यामागचे मूळ कारण अद्याप अस्पष्ट आहे. कौटुंबिक वाद, कामाचा ताण की अन्य काही वैयक्तिक कारण? यादृष्टीने पोलिस सध्या सर्व अंगांनी तपास करत आहेत. घटनास्थळाची फॉरेन्सिक टीमकडून पाहणी करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षकाच्या या अचानक जाण्याने पुणे पोलिस दलात आणि त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या…
बीड! बडतर्फ पोलिस अधिकारी सुनील नागरगोजे यांची आत्महत्या…
पोलिस आत्महत्या! प्रेमाचे दोन शब्द कधी तरी बोलली असती, तर..
मुंबईत पोलिस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या…
पुणे वाहतूक शाखेतील पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या…

