नाशिकमध्ये पोलिसाच्या पत्नीनं संपवलं जीवन; कारण आलं पुढं…

नाशिक : पोलिस पतीकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून एका महिलेने विष प्राशन करून जीवन संपवले आहे. विष घेतल्यानंतर तिने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी स्वत: गाडी चालवत रुग्णालयात धाव घेतली. मात्र पतीने तिला सोडून रुग्णालयातून पळ काढला. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच नाशिकच्या पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

दीपाली अनिल पवार (वय ३२, रा. क्लासिक निकेतन अपार्टमेंट, महात्मानगर) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ लिपिक असलेल्या संशयित पती अनिल पवार याला सातपूर पोलिसांनी अटक केली असून, नाशिक न्यायालयाने त्याला ९ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

मिळालेल्या माहितीनुसार, दीपाली यांनी स्वतःच्या कमाईतून अहिल्यानगर येथे एक फ्लॅट खरेदी केला होता. हा फ्लॅट दीर सुनील याच्या नावावर करण्यासाठी पती आणि सासरचे लोक त्यांच्यावर सातत्याने दबाव आणत होते. त्रासाला कंटाळून दीपाली यांनी विष प्राशन केले. विष प्राशन केल्यानंतर जीव वाचवण्यासाठी त्यांनी स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठले. मात्र, पतीने उपचारासाठी लागणारे पैसे भरण्यास नकार दिला आणि गंभीर अवस्थेत असलेल्या दीपाली यांना जिल्हा रुग्णालयाच्या पायऱ्यांवर सोडून पळ काढला.

दीपाली या जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका होत्या, तर पती अनिल हा सुरुवातीला एसआरपीएफ (SRPF) दौंड येथे आणि सध्या नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयात कार्यरत आहे. अनिलने दीपाली यांच्या पगाराचे एटीएम कार्ड स्वतःकडे ठेवून सर्व पैसे काढून घेतले होते. ७ वर्षांच्या मुलाच्या शिक्षणासाठी जेव्हा दीपाली यांनी कार्ड परत मागितले, तेव्हापासून छळ अधिक वाढला होता. कामाच्या ठिकाणाहून फोन आल्यास पतीने त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करण्यास सुरुवात केली होती. यापूर्वी त्यांनी कौटुंबिक हिंसाचाराची तक्रारही दाखल केली होती.

विष प्राशन केल्यानंतर दीपाली यांनी वडिलांना फोनवरून माहिती दिली होती. वडिलांनी तत्काळ भाऊ भूषण याला नाशिकला पाठवले. भावाने धाव घेत त्यांना खासगी रुग्णालयात हलवले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मृत दीपाली यांचे वडील सयाजी गायकवाड (रा. त्र्यंबक) यांच्या फिर्यादीवरून सातपूर पोलिस ठाण्यात पती अनिल पवार, सासू सुशिला, सासरे सोन्याबापू, दीर सुनील, जाऊ सुवर्णा, ननंद रेखा धोत्रे आणि नंदोई किशोर धोत्रे (सर्व रा. घारगाव, श्रीगोंदा) अशा सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक राहुल नळकांडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नाशिक! प्राध्यापिकेचे अश्लील व्हिडिओ विद्यार्थ्याने केले स्क्रीन रेकॉर्ड अन्…

नाशिक! डॉ. मनीषा जेजूरकर प्रकरणात नवा ट्विस्ट; दाजीचं वागणं खूप बदललं…

नाशिक! प्रेमात मला फसवले, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्…

नाशिक! विवाहितेच्या मृत्यू प्रकरणाला वळण, रिसॉर्टवर प्रियकराने घेतला जीव…

नाशिक! नवविवाहित दाम्पत्याचा अंत्यविधीसाठी जात असताना अपघाती मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!