
पुणे! आयटी इंजिनीअरने पत्नीला संपवलं अन् मारली गॅलरीतून उडी…
पुणे : कौटुंबिक कलहातून पतीने आपल्या पत्नीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवड शहरातून समोर आला आहे. आयटी इंजिनीअरने कौटुंबिक वादातून पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केला. नंतर स्वतःवर देखील वार करत दुसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
देहुगावातील ओमकार सोसायटी परिसरात 20 सप्टेंबर रोजी सकाळी पावणे सहाच्या सुमारास शुभांगी आकाश बारस्कर (वय 28) या गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्या. पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. त्यांचे पती आकाश रामदास बारस्कर (वय 26) हेही गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
View this post on Instagram
देहूरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना ओमकार सोसायटी परिसरात एका व्यक्तीला मारहाण झाल्याची माहिती मिळाली होती. पोलिस घटनास्थळी गेले असता आकाश हे रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळले. त्यानंतर सोसायटीतील दुसऱ्या मजल्यावरील खोलीत शुभांगी बेशुद्ध आणि गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्या. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुभांगी यांच्या मृतदेहाचे वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. आकाश यांच्यावर उपचार सुरू असून या घटनेचा पुढील तपास देहूरोड पोलिस करत आहेत.
दरम्यान, आकाश आणि शुभांगी यांचा डिसेंबर 2023 मध्ये विवाह झाला होता. गेल्या चार-पाच महिन्यांपासून दोघे ओमकार सोसायटीत भाड्याने राहत होते. आकाश हे आयटी इंजिनिअर असून हिंजवडी आयटी पार्कमधील एका कंपनीत काम करतात, तर शुभांगी खासगी कंपनीत नोकरी करत होत्या. सततच्या वादातून आकाश यांनी शुभांगी यांच्यावर शस्त्राने वार केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर आकाश यांनी स्वतःलाही जखमी करून दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
पुणे! व्यावसायिकाचा प्रेयसीसोबत परदेशात जायचा बेत अन् घडलं भलतंच…
पुणे जिल्ह्यात युवकाचा केला अत्यंत क्रूरपणे खून; धक्कादायक कारण समोर…
पुणे! कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू; नामांकित बिल्डरचं नाव चर्चेत…
पुणे! मैत्रिणीशी बोलल्याच्या रागातून युवकाचं अपहरण; पोलिस अधिकाऱ्याचे 21 कॉल अन् थरारक पाठलाग…
पुणे! प्रेमाच्या त्रिकोणातून नवविवाहितेची गळफास घेत आत्महत्या…

