मातोश्रीच्या गेटबाहेर हायव्होल्टेज ड्रामा, दिशा सालियनचे वडील आदित्य ठाकरेंना नोटीस द्यायला पोचले…

मुंबईः दिशा सालियान मृत्यू प्रकरणात मुंबईतील ठाकरे कुटुंबाचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ बंगल्याच्या गेटबाहेर शनिवारी दुपारी जोरदार हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. दिशा सालियनचे वडील सतीश सालियान हे स्वतः वकिलांच्या टीमसह आमदार आदित्य ठाकरे यांना कायदेशीर नोटीस देण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले.

आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन प्रकरणी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टनंतर सतीश सालियान यांनी आदित्य ठाकरे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. त्यासंदर्भातील नोटीस देण्यासाठी सतीश सालियान हे मातोश्रीवर दाखल झाले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

मातोश्रीवर पोहोचण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना सतीश सालियन अत्यंत आक्रमक पवित्र्यात दिसले. ‘मला कोणीही कंट्रोल करू शकत नाही. फक्त देव मला कंट्रोल करू शकतो, दुसरं कोणीही नाही,’ अशा कडक शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. तर मातोश्रीबाहेर पोचताच सतीश सालियन यांनी माझ्यासोबत वकिलांची पूर्ण टीम आहे. त्यांनी वेळ घेतला म्हणून सहा वर्षे गेली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला त्यावर समाधानी आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

सतीश सालियान आणि त्यांच्या वकिलांची टीम आल्याची माहिती मिळताच मातोश्रीवरही हालचालींना वेग आला. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई हे देखील मातोश्रीवर दाखल झाले होते. तर अनिल परब यांनी आदित्य ठाकरेंची बाजू मांडण्यासाठी वकील दिले असून, अॅडव्होकेट राहुल दिवटे आणि अॅडव्होकेट अनिल जाधव हे वकील नोटीस स्वीकारण्यासाठी थेट मातोश्रीच्या मुख्य गेटवर थांबल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, यावेळी मातोश्री बाहेर मोठा गोंधळ पाहायला मिळाला. पोलिसांनी मातोश्रीचे गेट बंद केले होते. मातोश्री बाहेर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. शिवसैनिक मातोश्री बाहेर आक्रमक झाल्याचे दिसून आले. सतीश सालियान यांना आत जाऊ देणार नाही, अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली होती. यानंतर आदित्य ठाकरेंना बजावण्यात आलेली ५०० कोटींची अब्रुनुकसानाची नोटीस ठाकरेंच्या वकिलांनी स्वीकारली. नोटीस स्वीकारल्याची पावती सतीश सालियन यांच्या वकिलांना देण्यात आली.

दिशा सालियान मृत्यू प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय…

अभिनेत्री दिशा पटानी हिच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींचा एन्काऊंटर…

दिशा सालियान हिने वडिलांच्या अनैतिक संबंधाला कंटाळून केली आत्महत्या…

ससूनचा कारभार! दिशा भोईटे प्रकरण अद्याप संपलेले नाही…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!