पुणे! हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; फोनवरून बुकिंग अन् लॉजवर मुली…

पुणे : पुणे शहरातील खराडी परिसरात फोनवरून ऑर्डर घेऊन हॉटेल अन् लॉजवर मुली पुरवणाऱ्या एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा येरवडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी थेट ‘बनावट ग्राहक’ पाठवून सापळा रचला आणि या देहव्यापाराचा भांडाफोड केला. या धडक कारवाईत दोन दलालांना बेड्या ठोकण्यात आल्या असून, दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा पोलिस ठाण्याचे अंमलदार रमेश नवले यांना गुप्त खबऱ्यामार्फत बातमी मिळाली होती की, खराडी आणि येरवडा परिसरातील हॉटेल्स तसेच लॉजमध्ये फोनवरून मुली पुरवून अनैतिक देहव्यापार चालवला जात आहे. राज राजेशाम सविता (वय २८, रा. खराडी) आणि सुनील शिवाजी शिंदे (वय ३७, रा. काळेपडळ, हडपसर) हे दोघे मिळून हा काळा धंदा चालवत असल्याचे निष्पन्न झाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गिते यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी आधी एका बनावट ग्राहकाला आरोपींशी संपर्क साधायला लावला. माहितीची १०० टक्के खातरजमा होताच, पोलिसांच्या पथकाने खराडीतील संबंधित हॉटेलवर अचानक धाड टाकली. धाडीदरम्यान पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या राज सविता आणि सुनील शिंदे यांना पोलिसांनी रंगेहात बेड्या ठोकल्या. या धडक कारवाईत पोलिसांनी हॉटेलमधून दोन पीडित महिलांची सुटका केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे! व्हॉट्सॲपवरून सुरू होता हायप्रोफाईल सेक्स रॅकेट; पोलिसांनी केला पर्दाफाश…

पुणे शहरातील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; परदेशी युवतींची सुटका…

उल्लूची अभिनेत्री चालवायची सेक्स रॅकेट; पोलिसांनी पकडले रंगेहात…

मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; आरोपींच्या मोबाईलमध्ये 546 मुलींचे अश्लील फोटो अन् व्हिडिओ…

पुणे शहरातील आयटी परिसरातून परदेशी युवतींची वेश्या व्यवसायातून सुटका…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!